rajkiyalive

SANGLI : विवाहिता गर्भपात मृत्यू प्रकरणी : डॉक्टरांसह सात जण ताब्यात

सांगली :

SANGLI : विवाहिता गर्भपात मृत्यू प्रकरणी : डॉक्टरांसह सात जण ताब्यात : जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून कर्नाटकातील महालिंगपूर (जि. बागलकोट) येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी सांगली, जयसिंगपूर आणि कर्नाटकातील डॉक्टरांसह सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी महालिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यापूर्वी गर्भपात करणार्‍या डॉ. कविता बडनेवार या महिलेला अटक करण्यात आली होती.

SANGLI : विवाहिता गर्भपात मृत्यू प्रकरणी : डॉक्टरांसह सात जण ताब्यात

कर्नाटक, सांगली, जयसिंगपूर मधील डॉक्टरांचाही समावेश : सांगली पोलिसांची कारवाई.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये संजय गवळी, संगीता संजय गवळी, विजय संजय गवळी (तिघे रा. दुधगाव ता. मिरज), डॉ. मारुती बाबासो खरात रा. कुपवाड), डॉ. कोठीवाले (रा. रामानंदनगर ता. अथणी जि. बेळगाव), डॉ. कविता बडनेवार (रा. महालिंगपूर जि. बागलकोट) आणि जयसिंगपूर मधील सोनोग्राफी करणारे डॉक्टर तसेच मयत सोनाली कदम यांचे गर्भलिंग निदान व गर्भपात करताना डॉक्टरांना सहकार्य करणार्‍यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुधगाव येथील माहेरवाशीन असलेल्या सोनाली सचिन कदम (वय 32 रा. आळते, ता. हातकणंगले) यांचा गर्भपातावेळी महालिंगपूर येथे मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते. मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शहरात फिरत असताना हा प्रकार सांगली पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली. यानंतर मृत सोनाली यांचा भाऊ आणि त्याला मदत करणारा येथील एका बोगस डॉक्टरला महालिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बागलकोट येथे जावून तेथील अधिकार्यांची भेट घेतली व गुन्हा वर्ग केला. यानंतर महालिंगपूर पोलिसांनी कविता बडनेवार या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तिने सोनाली यांचा गर्भपात केला होता.

यावेळी प्रकृती गंभीर बनल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. महालिंगपूर पोलिसांनी कविता हिला अटक केली आहे तर या प्रकरणात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आता सांगली पोलिसांनी एकूण डॉक्टरांसह सात जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी त्यांना महालिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज