rajkiyalive

सांगलीची जागेची चर्चा नव्हती: टीव्हीवरून उमेदवारी कळाली: शरद पवार

जनप्रवास । सांगली
सांगलीची जागेची चर्चा नव्हती: टीव्हीवरून उमेदवारी कळाली: शरद पवार : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविताना चर्चा केली नाही. तेथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीत आणखी खळबळ उडाली आहे.

सांगलीची जागेची चर्चा नव्हती: टीव्हीवरून उमेदवारी कळाली: शरद पवार

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी होत असताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवताना कुणी जास्त जागा मागायच्या नाहीत असे ठरले होते. कोणत्या पक्षाचा उमेदवार तेथे निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला द्यायची या सुत्रानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले. आम्ही फक्त 10 जागा घेतल्या.

कोल्हापूरची जागा स्वतःहून छत्रपती शाहू महाराज यांना आग्रह करुन दिली.

मात्र, याला सांगली लोकसभा मतदारसंघ अपवाद ठरला. येथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरुनच कळाली. कोण उमेदवार आहे हेही टीव्हीवरुनच समजले असल्याचा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला. पण, एकदा निर्णय घेतला आहे म्हंटल्यावर आम्ही या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या धक्कादायक खुलाशामुळे काँग्रेसमधली अस्वस्थ वाढून महाविकास आघाडीला तडे जाण्याची दाट शक्यता आहे.

मला व विशाल पाटलांना टार्गेट केले जाताय: आ. विश्वजीत कदम

काँग्रेसचे नेते, आ. विश्वजीत कदम यांची नाराजी असल्याचे दूर झालेली नाही. त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीतील एका नेत्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले, कुठेतरी काहीतरी शिजलंय. काय शिजलंय, कसं शिजलंय? कुणी शिजवलं हे येणार्‍या काळात उघडकीस येईल. पण एक नक्की सांगलीची जागा ही जात नव्हती. पण काहीतरी षडयंत्र झालेलं आहे. जेणेकरुन राज्याच्या राजकारणात मला आणि जिल्ह्याच्या राजकारणात विशाल पाटील असे आम्हाला दोघांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला.हे षडयंत्र कुणी शिजवले यावर लवकरच बोलेल, असे आ. विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज