SANGLI : (Modi ) मोदी आवास योजनेतून 2 हजार घरकुलं : सर्वांसाठी घरे-2024 हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणार्या पात्र लाभार्थ्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. ओबीसी आणि एसबीसीच्या लाभार्थ्यांसाठी जिल्हयास 1958 उदिष्ट आले होते. जत तालुक्यात सर्वाधिक 520 घरकुलांचा समावेश आहे. सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून घरकुलाचे बांधकाम सुरु करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
SANGLI : (Modi ) मोदी आवास योजनेतून 2 हजार घरकुलं
जत तालुक्यात सर्वाधिक 520 कुटुंबांना लाभ
जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली : राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. परंतु इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) लाभार्थ्यासाठी अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना’ सुरु केली आहे. सांगली जिल्हयासाठी सन 2023-24 अंतर्गत एकूण 1958 उदिष्ट प्राप्त आहे. या योजनेमध्ये 1903 इतके उदिष्ट इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) च 55 इतके उद्दिष्ट विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) साठी प्राप्त झाले होते. या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
ओबीसी आणि एसबीसीच्या लाभार्थ्यांमध्ये जत तालुक्यात सर्वाधिक 520 घरकुलांना मंजुरी मिळाली. आटपाडी तालुक्यात 162, कडेगाव 114, कवठेमहांकाळ 155, खानापूर 55, मिरज 249, पलूस 150, शिराळा 93, तासगाव 189 आणि वाळवा तालुक्यात 255 घरकुलांना मंजुरी सीईओ धोडमिसे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निखिल ओसवाल यांनी दिली. प्रधानमंत्री आवासच्या धर्तीवर मोदी आवास योजनेतून 1 लाख 20 हजाराचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान तीन टप्प्यात लाभार्थींना मिळेल.
प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांना 100 टक्के मंजूरी देण्यात सांगली जिल्हा अग्रस्थानी ठरला आहे. या लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी केले आहे.
मोदी आवास योजनेतील मंजूर घरकुले
तालुका ओबीसी एसबीसी एकूण
आटपाडी 160 2 162
कडेगाव 114 3 520
क.महांकाळ 155 0 155
खानापूर 69 2 71
मिरज 217 32 249
पलूस 150 0 150
शिराळा 93 0 93
तासगाव 177 12 189
वाळवा 251 4 255
एकूण 1903 55 1958
“सर्वासाठी घरे २०२४” हे राज्य शासनाचे धोरण
असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत
. याच धर्तीवर राज्य शासनाने इतर मागास प्रवर्गातील व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता “मोदी आवास घरकुल योजना” ही घरकुल योजना नुकतीच सुरु केलेली आहे. मिरज तालुक्यामधून सर्वप्रथम १२३ घरकुले मोदी आवास जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत मंजूर करणेत आलेले आहे.
१२७ लाभाथ्यांची बैठक
यामध्ये जिल्हा परिषद, सांगली कडील मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीम तृप्ती धोडमिसे व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. निखिल ओसवाल सो यांचे योगदान लाभले. अशा १२७ लाभाथ्यांची बैठक व रमाई आवास मधील नविन मंजूर ५४ लाभार्थ्यांची बैठक मा. गट विकास अधिकारी डॉ. संध्या जगताप मॅडम व सहा. गट विकास अधिकारी मा. ज्ञानदेव मडके सो यांच्या मार्गदर्शनाखाली घेणेत आली.
अशी आहे योजना (Modi Awas Gharkul Yojana)
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटीक सिस्टिमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
वरील नमूद मधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थींना किमान 269 चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल.
इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थींना प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येवून लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करुन घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल.
आर्थिक अनुदानाबाबत संपूर्ण मार्गदर्शन
या लाभार्थ्यांना घरकुल बांधणेबाबत व देणेत येणाऱ्या आर्थिक अनुदानाबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणेत आले. घरकुल बांधकाम वेळेत सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत सुचना देणेत आल्या. यावेळी पंचायत समिती कडील विस्तार अधिकारी संतोष इंगळे, अधिक्षक कृष्णात लोहार, apo शंकर सिसाळ, लिपिक भारत कांबळे, समिक्षा वळवडे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक अजय नलवडे, डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल काशिद इ. सह संबंधीत ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
. यावेळी घरकुलांबरोबरच अन्य विविध योजनांमधून मिळणान्या अनुदानाची माहिती लाभार्थ्यांना देणेत आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.