rajkiyalive

सांगलीतील ओन्ली अज्या या सराईत गँगवार मोक्का : टोळीतील सात जणांचा समावेश :

 

सांगली :

सांगलीतील ओन्ली अज्या या सराईत गँगवार मोक्का : टोळीतील सात जणांचा समावेश : : खून, खुनाचे प्रयत्न, हाणामारी, दहशत माजवणे यांसह गंभीर गुन्हे दाखल असलेली तसेच अश्विनीकुमार मुळके खून प्रकरणातील ओन्ली अज्या टोळीवर आज मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सदरची कारवाई केली. अजय खोत या टोळीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची टोळी हि कायदा न जुमानणार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सांगलीतील ओन्ली अज्या या सराईत गँगवार मोक्का : टोळीतील सात जणांचा समावेश :

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींची कारवाई.

टोळी प्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय 23), विकी प्रशांत पवार (वय 22), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय 28), अर्जुन हणमंतराव पवार (वय 22 चौघे रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, वडर कॉलनी, सांगली), गणेश रामाप्पा ऐवळे (वय 36 रा. गोकुळनगर, सांगली), सुजित दादासो चंदनशिवे (वय 29 रा. उत्तर शिवाजीनगर फायर स्टेशन जवळ, सांगली) अशी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवार दि. 13 मार्च रोजी रात्री 11 च्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरूद्वारजवळ असणार्‍या त्याच्या घरासमोर अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय 30, नवीन वसाहत, सांगली) थांबला होता. त्यावेळी संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता. विकी यास अश्विनकुमार याने, हा रस्ता वाहतुकीसाठी नसल्याने या मार्गाने जावू नको असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अश्विनकुमारचा बदला घेण्याच्या उद्देशाने दोन तासांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास दुचाकीवरून सात संशयित पुन्हा अश्विनकुमारच्या घरानजीक आले.

काही कळायच्या आत त्याच्यावर धारदार शस्त्राने तसेच स्टंप, फरशीने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी अश्विनकुमारच्या पोटात खोलवर शस्त्राने वार केला. गंभीर जखमी झालेला अश्विनकुमार रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर खाली पडला. दरम्यान अश्विनकुमारचा आरडाओरडा ऐकून त्याचा मित्र गणेश महादेव हाताळे हा त्याच्या मदतीसाठी घटनास्थळी आला. त्याच्या डाव्या हातावरही हल्लेखोरांनी शस्त्राने वार केला. संशयित शस्त्रास्त्रांचा धाक दाखवित तेथून पसार झाले होते.

दि. 14 रोजी उपचार सुरु असताना अश्विनकुमार याचा मृत्यू झाला.

दरम्यान हल्ला करणार्‍या संशयित सात सराईत गुन्हेगारांना विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कराड आणि सातारा येथून आठ तासात जेरबंद केले. अजय खोत टोळीचे कार्यक्षेत्र हे विश्रामबाग परिसरात आहे. या टोळीवर 2014 ते 2024 या कालावधीत अनेक गुन्हे दाखल आहेत. टोळीचे वर्चस्व राहावे यासाठी संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, किरकोळ कारणातून खून करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे चोरी, जबरी चोरी, बिगर परवाना शस्त्रे बाळगणे असे गुन्हे केले आहेत.

या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोक्काची कारवाई करावी यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. अपर अधीक्षक रितू खोकर यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून सदरचा प्रस्ताव मोक्का कायद्यान्वये तपास करण्याची मंजुरी मिळावी यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला होता. फुलारी यांनी सदर प्रस्तावास मंजुरी देऊन टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

सदरची कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, ईश्वर ओमासे, उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर, कर्मचारी अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, बसवराज शिरगुप्पी, पूजा जगदाळे यांनी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज