rajkiyalive

sanjaykaka patil news : तासगावात भव्य पदयात्रा, उत्स्फूर्त स्वागत, गर्दीचे रेकॉर्ड मोडले 

sanjaykaka patil news : तासगावात भव्य पदयात्रा, उत्स्फूर्त स्वागत, गर्दीचे रेकॉर्ड मोडले :  तासगाव कवठेमंकाळ मतदार संघात 35 वर्ष निष्क्रियतेमुळे विकासाचा बॅकलॉग तयार झाला आहे  हा बॅकलॉग संपवून परिवर्तन घडवण्यासाठी मला साथ द्या,असे भावनिक आवाहन संजयकाका पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव शहरातील महिला पुरुष युवक यांची शहरातून भव्य पदयात्रा झाली. याला विक्रमी संख्येने लोक उपस्थित होते. या  यावेळी संजय काका पाटील बोलत होते.

sanjaykaka patil news : तासगावात भव्य पदयात्रा, उत्स्फूर्त स्वागत, गर्दीचे रेकॉर्ड मोडले 

    यावेळी ज्योतिकाकी पाटील, प्रभाकरबाबा पाटील ,वैष्णवी पाटील यांच्याबरोबर  तासगाव शहरात तील नागरिक  महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते  पदयात्रेमध्ये   ठिकठिकाणी माता-भगिनीनी काकांचे औक्षण केले. आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या नेहमीच पाठीशी राहू असे आश्वासन यावेळी संजय काका पाटील यांना महिलांनी दिले. शहरातील सर्वच भागात या पदयात्रेचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
      यावेळी नागरिकांशी संवाद साधताना संजय काका म्हणाले, माझ्या पहिल्या निवडणुकीपासून  तासगाव शहर नेहमी माझ्या पाठीशी ताकतीने  उभे राहिले आहे.तुमच्या सगळ्यांच्या त्या पाठबळामुळेच माझे नेतृत्व खऱ्या अर्थाने उभे राहिले. मतदारसंघातून तीन नॅशनल हायवे आणले ,त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल अवघ्या काही तासात बेंगलोर -मुंबईला जाणार आहे. कोविडच्या अडचणीच्या काळात कोविड हॉस्पिटल उभा करून लोकांना आधार देण्याचा प्रयत्न केला .
तासगाव शहरात साडेसात कोटी रुपये खर्चून अद्यावत कस्तुरबा हॉस्पिटल बांधले. पुढील काळात मतदार संघातील आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम केली जाईल. शहर आणि तालुक्यात भौतिक गरजा असणारी कामे केलीच, पण त्याबरोबर महत्त्वाचे म्हणजे या शहराच्या उज्वल भवितव्यासाठी इथल्या तरुण पिढीनं शिक्षणात मागे राहू नये म्हणून सर्वात पहिला इथल्या शाळा सुधारल्या. त्यातही शाळेच्या चांगले इमारती बांधल्याच पण त्याही पुढे जाऊन मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ही प्रयत्न केले. लांबून येणाऱ्या मुलांच्या सोयीसाठी मोफत स्कूल बस  चालवली.
    केंद्र सरकारच्या आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विक्रमी संख्येने घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला,त्यामुळे तासगाव कवठेमंकाळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातल्या नागरिकांना याचा फायदा झाला.केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून फेरीवाले लहान उद्योजक यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.महिला बचत गटांच्या माध्यमातून शहरातील महिलांना ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला.
    आता राज्य सरकारने लाडके बहीण योजना राबवताना 1500 वरून 2100 रुपये देण्याचे  जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज बिल शून्य झाले आहे. याशिवाय महायुती सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत. शासनाच्या या योजनेचा लाभ आपल्याला मिळण्यासाठी  35 वर्षाची तालुक्यातली निष्क्रिय राजवट संपवण्यासाठी  तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.वीस तारखेला घड्याळ समोरील चार नंबरचे बटन दाबून मला विजयी करावे असे आवाहन यावेळी संजय काका पाटील यांनी केले.
   तासगाव शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या जागृत गणरायाचे दर्शन घेऊन पद यात्रेला  सुरुवात झाली ,गणपती मंदिर -गुरुवार पेठ -काशीपुरा येथून शिवतीर्थ चौकात पदयात्रा आली .या ठिकाणी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर बस स्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रा सिद्धेश्वर रोडला आली ,बागणे चौक -नागराज गल्ली-जोशी गल्ली- वंदे मातरम चौकातून सिद्धेश्वर चौक -पागा गल्ली  -कोकणे  कॉर्नर -वरचे गल्ली -शिवनेरी चौक -सोमवार पेठ -माळी गल्ली -मुस्लिम मोहल्ला -विटा नाका येथून  मार्केट कमिटी येथे पद यात्रेचा समारोप झाला
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज