rajkiyalive

sanjaykaka patil news : भाजपमध्ये शिरकावसाठी संजयकाकांची धडपड

sanjaykaka-patil-news-sanjaykakas-struggle-to-join-bjp

sanjaykaka patil news : भाजपमध्ये शिरकावसाठी संजयकाकांची धडपड : ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांची भाजपमध्ये शिरकावासाठी धडपड सुरु आहे. सलग दहा वर्षे खासदार असताना पक्षातील नेते आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नाही, त्यामुळे माजी खासदारांना पक्षात प्रवेश देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजयकाका पुन्हा भाजपमध्ये परतण्याविषयी साशंकता आहे.

sanjaykaka patil news : भाजपमध्ये शिरकावसाठी संजयकाकांची धडपड

माजी खासदारांना स्थानिक नेत्यांचा विरोध

राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली आहे. भाजपमधून अन्य पक्षांत गेलेल्या नेत्यांची काेंंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी माजी खासदार संजयकाका पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील या दोघांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. या दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र तेथे अपयश आले. माजी खासदार संजयकाका महायुतीत असले तरी राष्ट्रवादीत मन रमलेले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

मागील आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकर्‍यांची बैठक झाली. या बैठकीला निमंत्रण नसतानाही माजी खासदार पाटील यांनी हजेरी लावली होती. ऐवढेच नव्हे तर ते प्रदेशाध्यक्षांच्या व्यासपीठावर पुढे जावून बसले होते. माजी खासदारांच्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सदस्य नोंदणी करण्यात आली, याठिकाणी चांगली सदस्य नोंदणीही झाली आहे. त्यासाठी माजी खासदारांनी कोणतेही योगदान दिले नाही. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील स्थानिक नेतेही नाराज आहेत.

sanjaykaka-patil-news-sanjaykakas-struggle-to-join-bjp

संजयकाका पाटील हे दहा वर्षे खासदार राहिले. या कालावधीत त्यांचा कारभार एकहाती राहिला. भाजपमधील नेत्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. त्या काळात भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह माजी आमदारांनीही त्यांच्याविरोधात पक्षाकडे तक्रार केली होती, परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते संजयकाकांच्या पाठीशी राहिले, त्यामुळे लोकसभेला सलग तिसर्‍यांदा भाजपचे तिकीट मिळाले होते. पक्षांतर्गत नाराजी निवडणुकीत भोवली, त्यामुळे संजयकाकांची हॅटट्रिक हुकली होती.

आता पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपड सुरु केली आहे. पक्षाचे जेष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामार्फत पक्ष प्रवेशासाठी प्रयत्नशिल आहेत. पक्षातील नेत्यांना विश्वासान न घेणे, मनमानी कारभार तसेच पक्ष वाढीसाठी कोणतेही योगदान माजी खासदार पाटील यांच्याकडून मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाला स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.

आधी चंद्रकांतदादांवर कुरघोड्या, आता प्रवेशासाठी त्यांच्या मागे

माजी खासदार संजयकाका पाटील हे भाजपचे जेष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामार्फत पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या चंद्रकांतदादांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. यापूर्वीही त्यांच्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी राहिली, त्या कालावधीत माजी खासदार संजयकाकांनी त्यांच्यावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला होता. अनेकवेळा त्यांच्या आदेशाला माजी खासदारांनी वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्याची चर्चाही भाजप नेते व पदाधिकार्‍यांत सुरु आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज