dineshkumar aitawade 9850652056
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद्र माणगावे यांची निवड : मिरज तालुक्यातील 3 हजार लोकसख्या असणार्या सावळवाडी या छोट्याशा गावातील एका उद्योजकाच्या घरात जन्मलेल्या रवींद्र माणगावे यांची नुकतीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद्र माणगावे यांची निवड
आजोबांकडून व्यापार आणि उद्योगाचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. त्यामुळे त्यांचा कल मोठा उद्योजक होण्याकडेच होता. आणि त्यांची वाटचालही त्यापध्दीने झाले. एस. आर. एम. या इम्पोंर्ट, एक्सपोर्टच्या माध्यमातून त्यांनी जग पादाक्रांत केले.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=TCKyQU4VArw[/embedyt]
राज्याच्या सीमा ओलांडून त्यांना काम करायचे होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची संधी त्यांना चालून आली. गेल्या अनेक वर्षापासून चेंबरच्या संचालक मंडळावर त्यांची बिनविरोध निवड होत होती. गेल्या काही वर्षापासून त्यांनी निम्मे जग फिरून आले आहेत. चेंबरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक उद्योग धंद्यांना त्यांनी उभारी दिली.
आता त्यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. येथून पुढचा काळ त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. त्यांना आपल्या कामाचा ठसा केवळ राज्यातच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेरही उमटविण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ते कमी पडणार नाहीत, यात काही शंका नाही.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.