rajkiyalive

SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार

SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार

जनप्रवास । प्रतिनिधी
SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो, यामुळे पिकाऊ जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या महामार्गाची गरज नसताना केला जात आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी आग्रही भूमीका घ्यावी, अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव समितीच्यावतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. खा. पवार यांनी या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ, अशी ग्वाही दिली.

SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार

शक्तीपीठ महामार्गाबाबत सोमवारी बाधित शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने खा. शरद पवार यांची सांगलीत भेट घेतली. त्यांच्यासमोर शेतकर्‍यांच्या सर्व अडचणी मांडल्या. नागपूर-गोवा महामार्गात शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी आदी गावातील पाच हजार शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत.

मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे.

तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकर्‍यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत. त्यांचा फारच तोटा होणार आहे. काही शेतकरी भूमीहीन होणार आहेत. मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणी वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर जाईल आणि ते परत लवकर हटणार नाही. याचा फटका सांगली शहर व परिसरातील गावांना बसणार आहे.

कृष्णा व वारणा नदीला महापूर आल्यास वारणेच्या फुगवट्यामुळे कृष्णेचे पाणी हरिपूर रोडवरील नाल्यातून बाहेर पडून ते अंकलीच्या हद्दीतुन परत नदीत जाते, पण रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे तिथे देखील पाणी आडणार आहे.त्यामुळे हा प्रस्तावित महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

खा. शरद पवार यांनी या महामार्गासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीने बैठक घेऊन आपली भूमीका त्यांच्यासमोर मांडण्याचे अश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात कॉ. उमेश देशमुख, सतीश साखळकर, उमेश एडके, दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, विष्णू पाटील, संग्राम पाटील अधिक पाटील, अनिल पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील, श्रीकांत पाटील, जयप्रकाश पाटील, गजानन सावंत, प्रकाश टकले, शेअर खान पठाण, एकनाथ कोळी आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज