rajkiyalive

SHARAD PAWAR IN SANGLI : दादा बापूंचा संघर्ष विकासासाठी

SHARAD PAWAR IN SANGLI : दादा बापूंचा संघर्ष विकासासाठी

SHARAD PAWAR IN SANGLI : दादा बापूंचा संघर्ष विकासासाठी शरद पवार : सांगलीत स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

SHARAD PAWAR IN SANGLI : दादा बापूंचा संघर्ष विकासासाठी

RAJKIYALIVE, SANGLI
सांगली: राज्यात वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात संघर्ष होता, पण विकासासाठी होता. ते सामंजस्यपणाने वाद मिटवत होते. माणसे जोडण्याचा बापुंचा स्वभाव होता. दादांनी सत्ता असताना विकास केला, पण विरोधात असताना राजारामबापू पाटील यांनी विकासाचे काम केले. त्यामुळे राज्याच्या विकासात दादांबरोबर राजारामबापूंचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले.

महापालिकेच्यावतीने स्टेशन चौकात उभारण्यात आलेल्या राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, आ. मानसिंगराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. विक्रमसिंह सावंत, आ. सुमनताई पाटील, आ. अरूण लाड, जेेष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर राजारामबापू पाटील प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष झाले

खा. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर राजारामबापू पाटील प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष झाले त्यावेळी मी पुणे जिल्ह्यात युवक काँग्रेसचा पदाधिकारी होती. तेव्हा बापुंना जवळून अनुभवता आले. पुण्यातील काँग्रेस कमिटी बाहेरील कट्यावर बसून बापुंचे विचार ऐकत होतो. माणसं जोडण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण राज्यात कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या संकल्पनेतून राज्यात नवीन उद्योग तयार झाले. अनेक ठिकाणी एमआयडीसीची निर्मीती केली. उद्योग व उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी ग्रामीण विकासाला योग्य दिशा देत प्रशासनावरही वचक निर्माण केला.

 

दोघांमधील मतभेद कधी विकासाच्या आड आणले नाही.

वसंतदादा व राजारामबापू यांच्यातील वादावर शरद पवार म्हणाले, दोघांमधील मतभेद कधी विकासाच्या आड आणले नाही. विकासकामे करताना दोघेही सामंजस्याने निर्णय घेत असत. दादा व बांपू यांच्या एक मोठा फरक होता. तो म्हणजे दादा सत्तेत राहून राज्याच्या विकासाचे, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम करायचे ते व्यवहारीक होते. तर बापू बराच काळ विरोधात गेला. पण तरीही त्यांचा माणसं जोडण्याचा स्वभाव, कार्यकर्ते जपण्याची कला या स्वभामुळे त्यांनी महाराष्ट्रात विकासात त्यांनी मोठी भूमीका आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून साखर कारखानदारी व अन्य संस्था उभारल्या.

दुष्काळाचा सामाना करताना देशातील सर्कसीचे खेळ करून स्वाभीमानाने जगण्याची भुमिका येथील लोकांनी घेतली.

त्यांनी जगण्यासाठी कधीही लाचारी पत्करली नाही. विरोधी पक्षात असताना शेतीमालाला भाव मिळावा यासाठी जळगाव ते लातूर दिंडी काढली. यात अनेकजण गळाले पण राजारामबापू व प्रा. एन. डी. पाटील यांनी एक तासही विश्रांती न घेता दिंडी पायी चालून पूर्ण केली. कष्टकरी, सामान्य माणसाला एक विचार देण्याची भूमीका त्यांची आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आ. जयंत पाटील काम करत आहेत. त्यांना साथ द्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

राजारामबापू पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी काम केले.

जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी राजारामबापू पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी काम केले. सभागृहात 6 हजार 500 प्रश्न त्यांनी विचारले. ज्या वाळवा तालुक्यात कुर्‍हाडीचे राजकारण होत होते. तेथील मुलांना पाटी-पेन्सिल दिली. सात हजार खेड्यात वीज, पाच मोठ्या औद्योगिक वसाहती त्यांनी उभ्या केल्या. स्टेशन चौकात वसंतदादा-राजारामबापू यांचे पुतळे आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये भांडणे होत होती, पण काम लक्षात ठेवायचे विकासात भांडणे नसायची. शरद पवार हे एका पक्षाचे नेते नव्हेत देशाच्या विकासाचे नेते आहेत.

संघर्षातही माणसे कशी जोडायची याचे शिक्षण राजारामबापू पाटील यांच्याकडून मिळते.

आ. जयंत पाटील म्हणाले, संघर्षातही माणसे कशी जोडायची याचे शिक्षण राजारामबापू पाटील यांच्याकडून मिळते. दादा-बापू यांच्यात वाद होत असे, पण त्यावेळी एकविचाराने बसून वाद मिटवले जात होते. राज्यात असे क्वचितच लोक आहेत. त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला आहे. त्यामुळे राजारामबापू पाटील यांचे स्मरण आजही होते. जिल्ह्यात अनेक माणसे त्यांनी जोडली. पण आता राजकारण विचाराचे राहिले नाही. वचपा काढण्याचे राजकारण सुरु आहे. राजारामाबापू पाटील यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सर्वांनी सहकार्य केले. हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. जिल्ह्यात लोकल बोर्ड, दुष्काळाच्या परिस्थितीत उभारलेले आड (विहीर), शाळा आजही दिसत आहेत. सध्या एक शाळा उभारायची म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद गेले तरी पूर्ण होत नाही.

 

पदयात्रेची नोंद इतिहासात झाली आहे.

आ. विश्वजीत कदम म्हणाले, राजारामबापू पाटील स्वातंत्र्य सैनिक होते. विकासात त्यांचे मोठे योगदान दिले. कामाच्या माध्यमातून कर्तृत्व उभे केले. आयुष्यात चढ-उतार आले. पण त्यांनी वाळवा तालुक्यात प्रचंड काम केले. विदर्भात त्यांचे मोठे काम आहे. त्यांनी काढलेल्या पदयात्रेची नोंद इतिहासात झाली आहे. तरुण पिढीसमोर त्यांनी मोठा आदर्श उभा केला आहे.

राजारामबापू पाटील यांनी शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबवल्या.

आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. पदयात्रा काढली. शेतकर्‍यांच्या प्रगतीची दारे उघडी केली. अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी सहकार्य केले. त्यांचा पूर्णाकृती पुतळा सांगलीच्या वैभवात भर घालेल.

स्वागत व प्रस्ताविक करताना आयुक्त सुनील पवार म्हणाले, स्व. राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी 2021 मध्ये ठराव करण्यात आला होता. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मान्यता दिली होती. यासाठी 60 लाख 38 हजार रूपयांचा मनपाने स्वयनिधी खर्च केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपायुक्त राहुल रोकडे, राहुल साबळे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रोहित पाटील, अनिता सगरे, दिलीप पाटील, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, पी. आर. पाटील, शेखर माने, विराज नाईक, सुरेश पाटील, प्रमोद चौगुले, वैभव शिंदे, भालचंद्र पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, संतोष पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा
SANGLI : राष्ट्रवादीची पडझड; शरद पवार कसे करणार पॅचअप?
SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले…
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ
सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
खासदार धैर्यशील माने म्हणतात, सतेज पाटलांची कोल्हापुरात कळ काढून चालत नाही!

भाजपने नेते अनुपस्थित…

राजारामबापू पाटील पूर्णाकृती पुतळा अनावरणच्या कार्यक्रमाला महापालिकेने भाजपच्या नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र पालकंमत्री सुरेश खाडे कार्यक्रमानिमित्त बाहेर होते. तर खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर यांची गैरहजेरी होती. तर महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

श्रध्देची जाहिरात करायची नसते; सरकार चुकीच्या लोकांकडे..

राजारामबापू कारखान्यावर त्यावेळी बापुंनी राममंदिर उभे केले, दररोज तेथे आरती होते. पण त्यांनी कधी याची जाहिरात केली नाही. जाहिरात न करता भक्ती करता येते, हे त्यांनी दाखविले. सध्या श्रध्देची जाहिरात सुरू आहे. हे सरकार घालवायला हवे, चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र देऊ नये, असे आवाहन जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

जयंत पाटलांना साथ द्या, त्याची उंची मोठी, सन्मानानं जगायचं हा सांगली जिल्ह्यातील लोकांचा बाणा; शरद पवारांची भावनिक साद

यंत पाटील यांना साथ द्या त्याची उंची मोठी आहे, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. ते सांगलीत लोकनेते स्व.राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार म्हणाले की, बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारणीसाठी त्यांनी मोठे काम केले. मंत्री म्हणूनही त्यांनी काम उत्तम केल्याचे गौरवउद्गार शरद पवारांनी काढले.
वसंतदादा यांचे जसे योगदान होते, तसे राजारामबापू यांचे योगदान तेवढेच होते, पण वसंतदादा सत्तेत होते आणि राजारामबापू सत्तेत नसायचे अशी टिपण्णी सुद्धा शरद पवार यांनी या कार्यक्रमात केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज