दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
shauwadi vidhansabha : विजयी उमेदवारांच्या पदरात सतत सत्यजित पाटलांचेच माप : 2009 साली देशातील लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामध्ये इचलकरंजी मतदार संघ रद्द होवून नवीन हातकणंगले लोकसभा मतदार संघांची निर्मिती झाली. या मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर या सहा मतदार संघांचा समावेश झाला.
shauwadi vidhansabha : विजयी उमेदवारांच्या पदरात सतत सत्यजित पाटलांचेच माप
लोकसभा मतदार संघातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी या मतदार संघात विनय कोरे आणि सत्याजित पाटील सरूडकर यांचीची आळीपाळीने सत्ता आहे. बाबासाहेब पाटील सरूडकर हे दोन वेळा आमदार तर सत्यजित पाटील सरूडकर हे दोन वेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे तेथे विनय कोरे आणि सरूडकर यांच्या गटाचेच प्राबल्य आहे.
2009 च्या निवडणुकीत शिरोळचे तत्कालीन आमदार राजू शेट्टी खासदारकीच्या मैदानात उतरले.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाटणीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाटणीला गेला आणि इचलकरंजीच्या निवेदिता माने यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. नवख्या असणार्या राजू शेट्टी यांना शेतकर्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आमदारकीनंतर लगेचच शेट्टींंच्या गळयात खासदारकीची माळ पडली. शेट्टी शेतकर्यांच्या गळ्यातील ताईत बनले.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदार संघात राजू शेट्टींना 88197 तर राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंना 41094 मते मिळाली. सुमारे 47 हजार मताचे लीड राजू शेट्टींनी घेतले. या निवडणुकीत सत्याजित पाटील सरूडकरांनी शेट्टींना साथ दिली होती.
2014 च्या निवडणुकीत खासदार असलेल्या राजू शेट्टींनी भाजप आघाडीत जाणे पसंत केले.
याचवेळी देशात नरेंद्र मोदींची लाट आली होती. भाजपने हातकणंगले मतदार संघ राज्ाू शेट्टींसाठी सोडला. विरोधी उमेदवार लवकर फायनल होत नव्हता. शेवटी हात मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि माजी खासदार असलेल्या कल्लापाण्णा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. या निवडणुकीत शाहूवाडीतून पुन्हा एकदा राजू शेट्टींनीच बाजी मारली. या मतदार संघात त्यांना 106193 मते मिळाली तर कल्लापाण्णा आवाडे यांना 63213 मते मिळाली. यावेळी सुमारे 45 हजार मतांचे लीड राजू शेट्टीं या मिळाले.
गेल्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टींनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सामिल झाले.
आघाडीने त्यांच्यासाठी मतदार संघ सोडला. भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला हा मतदार संघ गेला. राष्ट्रवादीत असणार्या धैर्यशील माने यांनी मातोश्रीवर जावून शिवबंधन बांधून घेतले आणि उमेदवारी पदरात पाडून घेतली. दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या राजू शेट्टींच्या विरोधात वातावरण तयार करण्यात धैर्यशील मानेंना यश आले आणि ते निवडून आले.
पन्हाळा शाहूवाडी मतदार संघात या निवडणुकीत 94200 मते मिळाली तर राजू शेट्टी यांना केवळ 72457 मते मिळाली.
सुमारे 22 हजार मतांनी राजू शेट्टी मागे पडले. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत सत्यजित पाटील सरूडकरांनी राजू शेट्टींना साथ दिली होती. तर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचे उमेदवार धैर्यशील मानेंना साथ दिली होती. त्यामुळे सत्यजित पाटील सरूडकड जिकडे तिकडे विजयी उमेदवार असे समिकरण तयार झाले आहे.
यंदाच्या निवडणुकीत स्वत: सत्यजित पाटील महाविकास आघाडीकडून उभे आहेत.
त्यांचे विरोधक असणारे विनय कोरे यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना साथ दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना हक्काचे मतदान कुणाचे हा प्रश्न पडला आहे. केवळ शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जिवावरच त्यांना पन्हाळा शाहूवाडी मतदार संघात रान पेटवावे लागणार आहे. एकंदरीत पन्हाळा शाहूवाडीने दोन वेळा राजू शेट्टींना तर एकवेळा धैर्यशील मानेंना साथ दिली आहे. यंदा कोणाच्या पदरात आपले माप टाकतात ते लवकरच कळेल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



