rajkiyalive

shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर

दिनेशकुमार ऐतवडे

shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर :राज्याच्या राजकारणात दबदबा असणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना सध्या घरघर लागली आहे. एकेकाळी सत्ताधारी आणि कारखानदारांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार्‍या संघटना आता देशोधडीला लागल्या आहेत. काही संघटना विरोधात राहून संपल्या तर काही संघटना सत्तेसोबत जावून आपले अस्तित्व संपवून बसल्या. त्यामुळे सध्या सरकारचे फावले असून, कारखानदार मुजोर झाले आहेत. याचा तोटा मात्र शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर

राज्यात शेतकरी संघटनेला नाव मिळवून देले ते शरद जोशींनी. अमेरिकेतील उच्चपदस्थ नोकरी सोडून शरद जोशी भारतात आले आणि शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी जिवाचे रान केले. राज्यभर फिरून यांनी संघटनेचे महत्व शेतकर्‍यांना पटवून दिले. शेतकर्‍यांच्या मालाला जर चांगला भाव मिळवायचे असेल तर सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटपयर्र्ंत सांगिलते. त्यांच्या हाकेला ओ देत अनेक कार्यकर्ते तयार झाले. कार्यकर्ते पुढे जावून नेते झाले. त्यापैकीच राजू शेट्टी,सदाभाउ खोत, वामनराव चटप, जयपाल फराटे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागले. हे सर्व हाडाचे शेतकरी शरद जोंशींच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आणि शेतकरी संघटनेला सर्वदूर पसरविले.

परंतु देशात कोणतीही चळवळ जास्त काळ टिकली नाही.

राजकारणाचा वास जर चळवळीला येवू लागला तर चळवळ संपायला वेळ लागत नाही. त्याचाच अनुभव शेतकरी संघटनेला आला. शरद जोशी यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर राजू शेट्टी आणि सदाभाउ खोत यांनी आपली वेगळी चूल मांडून स्वतंत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केला. बघताबघता या संघटनेचे राज्यात आपले नाव मोठे केले. स्वाभिमानी संघटनंचे संस्थापक असेलल्या राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य, आमदारकी आणि खासदारकी असा वरचा टप्पा गाठतच गेला. पहिल्यांदा जिल्हा परिषद झालेल्या राजू शेट्टींनी 2004 मध्ये शिरोळ मतदार संघातून विधानसभेत प्रवेश केला.

लगेच 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून दिल्ली गाठली.

या 10 ते 15 वर्षाच्या काळात राजू शेट्टी हे नाव देशभर गाजले. एवढेच नव्हे तर देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून राज्य आणि केंद्राबरोबर संघर्ष करण्याची तयारीही त्यांनी ठेवली. संसदेत शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणार्‍या शेट्टींना आपल्या माघारी काय चालले आहे हे कळलेच नाही.

2000 सालापास्ाून त्यांनी जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी पक्षातर्फे उस परिषद घ्यायला सुरूवात केली. या उसपरिषदेसाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकचे शेतकरीही हजर रहायचे. या परिषदेत उस तर ठरविले जाई. कारखानदारांकडून दर पदरात पाडून घेण्यासाठी आंदोलन करण्यासाठीही संघटना कधीही मागे राहिले. काही वेळा त्यांच्यामुळे फायदा झाला. संघटनेची वचक राज्यकर्त्यांना त्रास देवू लागली. त्यातूनच स्वाभिमानीने काळाची पावले ओळखून 2014 मध्ये भाजपबरोबर युती केली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली आणि येथेच संघटनेचा अंकुश कमी झाला.

सत्ता आपलीच असताना शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भांडायचे कसो असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आणि येथेच ठिणगीु पडली. संघटनेच्या माध्यमातून आमदार आणि मंत्री झालेल्या सदाभाउ खोत यांनी सवतासुभा मांडला आणि त्यांनी रयत क्रांती संघटना काढली. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटनेत फूट पडली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि येथे त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. नवख्या असणार्‍या धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला. त्यांच्या पराभवास सदाभाउ खोत यांनीही जंगजंग पछाडले. एकेकाळी एकमेकांच्या हातात हात घालून शेतकर्‍यांसाठी लढणारे आता एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. एक गट सत्ताधार्‍यांसोबत गेला तर दुसरा गट सत्ताधार्‍यांच्या विरोधात गेला.

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि येथे त्यांची फसगत झाले. सलग दोन वेळा खासदार झालेल्या राजू शेट्टींना पराभवाची धूळ चारावी लागली. येथेच त्यांचे मनोबल खचले. पुढे 2024 मध्येही त्यांचा पराभव झाला आणि विधानसभेलाही त्यांच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले.

2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे बिनीचे शिलेदार असलेल्या सावकार मादनाईक, वैभव कांबळे आणि जालिंदर पाटील यांनीही संघटनेला रामराम करून महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. इकडे सदाभाउंही भाजपवर तोंडसुख घेत आहेत. केवळ निवडणुकीसाठी आमचा उपयोग करून घेतला आणि मंत्रीपदावेळी आम्हाला दूर ठेवले असा त्यांनी आरोप सुरू केला आहे. सध्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक कारखानदारांनी आपआपले दर जाहीर केले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोठेच आंदोलनाचा मागमूस दिसत नाही. कारखानदार जो दर देतील तो शेतकर्‍यांना मान्य करायला लागणार आहे. कोणतीही संघटना आंदोलन करण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच संघटनांना घरघर लागली असून, येणार्‍या काळात संघटनांचे अस्तित्व तर राहते की नाही हे येणारा काळच ठरवेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज