rajkiyalive

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार : सांगली लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटेचे उमेदवार महेश खराडे यांनी मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत त्यांचा प्रचार पोहोचला आहे.

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 20 वर्षापासून महेश खराडे शेतकर्‍यांसाठी झटत आहेत. राजू शेट्टींनीही त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना जिल्हाध्यक्ष केले आहे. यंदा लोकसभेच्या मैदानात त्यांना उतरवले आहे. सांगलीच्या मैदानात भाजपचे संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे पै. चंद्रहार पाटील, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबरोबर त्यांचा सामना होणार आहे.

गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये महेश खराडे यांनी उसउत्पादक शेतकर्‍यांबरोबर द्राक्ष बागायतदार, बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांनाही चांगला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या प्रयत्नानेच बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आला आहे.

महेश खराडे यांनी सर्व शेतकर्‍यांना एकत्र करून जोरदार जनजागृती सुरू केली आहे.

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार : शासनाने नुकताच राज्यातील सर्व शक्तीपिठे एकाच मार्गावर आणण्यासाठी शक्तीपीठ महामार्गची निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. त्या मार्गावर हजारो हेक्टर जमिन हायवेखाली जाणार नाही. हे सर्व लक्षात घेवून महेश खराडे यांनी सर्व शेतकर्‍यांना एकत्र करून जोरदार जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल घेवून कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी येथील शेतकरी जागे झाले आणि त्यांनीही या योजनेला विरोध दर्शविला आहे.

त्यांच्या आंदोलनामुळे कवडीमोल दराने जाणारी जमिन वाचनार आहे.

शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या शासनाला जाब विचारण्यासाठी त्यांनी सांगली लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसापासून मी शेतकर्‍यांसाठी झटत आहे. शेतकरी मला विजयी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज