dineshkumar aitawade 9850652056
shirala bjp news : महाडिकांवर सतत अन्यायच…. : वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघात बलाढ्य जयंत पाटील यांच्या विरोधात सतत रान तापवत ठेवणार्या महाडिक बंधूना यंदाही भाजपने उमेदवारी नाकारली आहे. शिराळा मतदार संघातून प्रमुख दावेदार असणार्या सम्राट महाडिकांची तर उमेदवारी पक्की होती परंतु ऐनवेळी सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या विधानसभेलाही महाडिकांना डावलण्यात आले होतेेे. त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आलेल्या महाडिकांवर हा मोठा अन्याय झाल्याची चर्चा होत आहे.
shirala bjp news : महाडिकांवर सतत अन्यायच….
येलूरच्या महाडिक कुटुंंबांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. कोल्हापुरात महादेवराव महाडिक आमदार होते, सध्या धनंजय महाडिक खासदार आहेत. तर अमल महाडिक हेही आमदार होते. सध्या त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले आहे. शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. तर सध्या त्या गोकूळच्या संचालक आहेत. कोल्हापूरातील राजकारण महाडिक कुटुंबाभोवतीच सतत फिरत असते.
सांगलीतही पेठचे राजे म्हणून परिचित असणार्या महाडिक कुटुंबांची मात्र सांगलीच्या राजकारणात फारच कुचंबना झाली आहे.
नानासाहेब महाडिक हयात असतानाही त्यांना फारच संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पूत्र राहूल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनीही राजकारणात सक्रीय होत मोठी मजल मारली आहे. पतसंस्था, दूधसंघ, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. इस्लामपूर मतदार संघात राहूल महाडिक आणि शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक हे दोघेही इच्छुक होते. सम्राट महाडिकांना उमेदवारी मिळेल या आशेने राहूल महाडिक फार जहाल गेले नाहीत.
2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे मानसिंगराव नाईक उभे होते, त्यांच्या विरोधात भाजपने शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सम्राट महाडिकांनी बंडखोरी केली. यावेळी मानसिंगराव नाईक यांना 101933, तर शिवाजीराव नाईकांना 76002 व सम्राट महाडिकांना 46239 मते मिळाली. जवळपास 50 हजार मते घेणार्या सम्राट महाडिकांनी निवडणुकीनंतर पराजय विसरून कामाला लागले. संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांनी पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले.
कोणत्याही परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीत आपल्याला भाजप पक्षाची उमेदवारी मिळवायची या हेतूने त्यांनी पाच वर्षे पक्ष वाढविण्याचे काम केले. दरम्यानच्या काळात शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे सम्राट महाडिकांचे रान मोकळे झाले. त्यांना भाजपची उमेदवारी मिळाले असे असताना ऐनवेळी भाजपने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली. आणि पाच वर्षाच्या कामावर नांगर फिरला. ऐन उमेदीच्या काळात महाडिक कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना संपूर्ण मतदार संघात व्यक्त होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.