shirol news : शिरोळचे वीर सुपूत्र सूरज पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत यासह हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत शिरोळचे सुपुत्र वीरमरण आलेले जवान सुरज भारत पाटील यांच्यावर शिरोळ येथील जगदाळे वैकुंठधाम येथे शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या साश्रूनयनांनी जवान सुरज पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
shirol news : शिरोळचे वीर सुपूत्र सूरज पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे बॉम्बे इंजिनियर बटालियनमध्ये सेवेत असणारे सुरज पाटील यांना शनिवारी कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नगरीत आल्यानंतर येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर गणपतराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शिरोळ पोलीस ठाणे येथे पोलिसांनी मानवंदना दिली. आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी जवान सुरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शिरोळ नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर येथील अजिंक्यतारा मंडळ येथे पार्थिव आल्यानंतर मंडळाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुरज पाटील यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे वडील भारत पाटील आई सौ. सुरेखा पाटील, भाऊ संदीप, बहिणी सौ. प्रणाली, ज्योती, प्रियांका, आजी श्रीमती भागीरथी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणार होता. या ठिकाणी अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे आशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी अभिवादन केले. फुलाने सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा जगदाळे वैकुंठधाम आली.
अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठिकठिकाणी पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर शिरोळकर नागरिकांनी व महिलांनी पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. शहरातील एनसीसी ्चे विद्यार्थी आजी-माजी सैनिक पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण वर्ग हिरोजी माने पाटील समाज, यांनी अंतयात्रेचे नियोजन केले.
shirol-news-suraj-patil-the-brave-son-of-shirol-was-cremated-with-state-honors
पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे अंत्ययात्रा आली. भारतीय सैन्य दलातील कर्नल अमरसिंह सावंत,सुभेदार माळी, नायब सुभेदार विजय चव्हाण हवालदार विशाल सूर्यवंशी, खासदार धैर्यशील माने आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार दलित मित्र डॉ.अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्तचे अनिल यादव, अध्यक्ष रावसाहेब देसाई, पृथ्वीराजसिंह यादव, डॉ . अरविंद माने आदी उपस्थित होते.
यानंतर वडील भारत पाटील आणि भाऊ संदिप पाटील यांनी पार्थिवास भडाग्नी दिली. यावेळी उपस्थित हजारो साश्रूनयनानी त्यांना अखेरचा निरोप दिला. अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे या घोषणेने परिसर दणाणून गेला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



