dineshkumar aitawade 9850652056
shirol vidhansabha election 2024 : राजू शेट्टी विधानसभेच्या तयारीत : लोकसभेला सलग दुसर्यांदा पराभवाचा धक्का बसलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. राज्यात तिसरी आघाडी स्थापन करून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही धक्का देण्याची तयारी त्यांनी केली आहे. शिरोळ विधानसभा मतदार संघात सध्या अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. महायुतीमध्ये ही जागा अजून कोणाच्या वाटणीला हे ठरलेले नाही. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबरोबरच गुरूदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे हे भाजपकडून इच्छुक आहेत.
shirol vidhansabha election 2024 : राजू शेट्टी विधानसभेच्या तयारीत
दुसरीकडे महाविकास आघाडीतही माजी आमदार उल्हास पाटील हे मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. तर काँग्रेसकडून दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हेही इच्छुक असून, त्यांनी मतदार संघात कामही सुरू केले आहे. गेल्या निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सावकार मादनाईक यांना पराभवाचा धक्का बसला होता. तेही पुन्हा एकदा इच्छुक आहेत.
सलग दोन लोकसभेत पराभवानंतर शेतकरी संघटनेत मोठी मरगळ आली आहे. राजू शेट्टींकडे कोणतेही पद नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिरोळ विधानसभा मतदार संघात राजू शेटटी यांना फारच कमी मते पडली आहेत. येणार्या काळात संघटना टिकवायची असेल तर राजू शेट्टींना आमदारकी किंवा खासदारकी पदरात पाडून घ्यावी लागेल. तूर्तास खासदारकीचा प्रश्न नाही. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी स्वत: उतरल्यास अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहेे. यापूर्वीही राजू शेट्टींनी शिरोळ विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा त्यांना खुनावत आहे.
तिसर्या आघाडीच्या निमित्ताने संभाजीराजे, आ. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिरोळची जागा निश्चितच राजू शेट्टी यांच्या वाटणीला येईल. त्यामुळे स्वत: राजू शेट्टी या मतदार संघातून इच्छुक असून त्यांनी तयारीही केल्याचे समजते. राजू शेट्टी जर मैदानात उतरले तर राजेंद्र पाटील यड्रावकर, उल्हास पाटील, गणपतराव पाटील अशी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.