जयसिंगपूर /अजित पवार
SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये यड्रावकर तयारीला लागले; तर विरोधकात भयान शांतता : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय सत्ता संघर्षात कोण बाजी मारणार याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे विकास कामांच्या जोरावर पुन्हा ताकदीने कामाला लागले आहेत. यामुळे त्यांचे सर्वच कार्यकर्ते आता जोमात आहेत. त्यांच्या विरोधात कोण कोण उभे ठाकते हे मात्र आता पहावे लागणार आहे. परंतु या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीत मात्र भयान शांतता आहे.
SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये यड्रावकर तयारीला लागले; तर विरोधकात भयान शांतता
SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये यड्रावकर तयारीला लागले; तर विरोधकात भयान शांतता : कोट्यवधी रुपयाची विकासकामाची गंगा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात वाहून आणली आहे. या विकासकामांच्या जोरावरच त्यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा संकल्प केला आहे. उत्तरेकडील कवठेसारपासून ते कर्नाटक राज्याकडील खिद्रापूरपर्यंत त्यांनी विकासाची गंगा खेचून आणली आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यात ते कोठेही कमी पडले नाहीत.
यड्रावकर यांनी 2019 ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जनतेने त्यांना विधानसभेत पाठविले.
विधानसभेत धडक मारल्या मारल्या लगेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात प्रवेश केला. आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे एवढा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक विकास कामे तालुक्यात शासनाकडून मंजूर करून आणली. यामध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर जाळे विणले गेले. अनेक रस्त्यांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावले. औद्योगिक वसाहत यांचेही प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांचा विकासाचा रथ मोठ्या प्रमाणावर घोडदौड करीत आहे.
हे असे एकंदरीत असले तरी विरोधी गटात मात्र भयान शांतता आहे. विरोधी गटाकडून नेमके कोण कोण मैदानात उतरणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. उबाठा गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. तर काँग्रेसकडून दत्त कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांच्या नावाची ही चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत होमग्राउंड असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालेली मते लक्षात घेता त्यांच्या गटाकडून कोणाचे नाव निश्चित होईल हे अद्याप सांगता येत नाही. विरोधकांकडून अद्याप कोणाच्याही नावाची स्पष्टपणे चर्चा नसल्याने विरोधी आघाडीत मात्र भयान शांतता आहे.
आमदारकीसाठी यड्रावकरांची फिल्डिंग…
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात आपली सर्व ताकद पणाला लावली होती. यामुळेच धैर्यशील माने यांना तालुक्यातून एक नंबरची मते मिळाली. या मिळालेल्या मतांच्या बेरजेत यड्रावकर यांची मोठी फिल्डिंग खासदार माने यांच्या पाठीशी लागल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीसोबतच यड्रावकर यांनी आमदारकीसाठी तालुक्यात पुन्हा फिल्डिंग लावल्याचे आता चित्र पहावयास मिळत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.