rajkiyalive

shirol vidhansabha : सावकार मादनाईकांसह पदाधिकारी महायुतीच्या पाठिशी

 shirol vidhansabha : सावकार मादनाईकांसह पदाधिकारी महायुतीच्या पाठिशी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वय समिती सदस्य अनिल उर्फ सावकार मादनाईक, प्रदेश कोषाध्यक्ष मिलींद साखरपे, स्वाभिमानी पक्ष प्रदेश अध्यक्ष जालिंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष शैलेश आडके यासह पदाधिकार्‍यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रसिध्दीस दिले असून, शिरोळ तालुक्यात महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच जिल्ह्यातील अन्य महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रीय होणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट करण्यात आले.

shirol vidhansabha : सावकार मादनाईकांसह पदाधिकारी महायुतीच्या पाठिशी

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी खासदार राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय हा आम्हा पदाधिकार्यांना अमान्य आहे. सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही यापेक्षाही सक्षम असणारा ‘रिडालोस’ चा प्रयोग अयशस्वी ठरलेला होता. गेल्या 25 वर्षात संघटनेतील अनेकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले. मात्र राजकारणात आमची पिछेहाट का झाली याचे चिंतन व्हायला पाहिजे. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन सक्षम पर्याय आज निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेत आहोत.

महायुती सरकारने साडेसात एच.पी. पर्यंतच्या मोटर पंपांना दिलेली वीजमाफी, सन 2019 ते 2025 पर्यंत पाणीपुरवठा संस्थांना दिलेली वीज सवलत, उच्चदाबासाठी 1.16 पैसे आणि लघुदाबासाठी प्रति युनिट 1.00 रुपये दर जाहीर करून 1250 ते 1300 पाणीपुरवठा संस्था पश्चिम महाराष्ट्रात आहेत. उर्वरित महाराष्ट्रात 600 ते 700 संस्था आहेत. महाराष्ट्रातील 10 लाख शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, 45 हजार गावांना पाणंद रस्ते, वीज बीलात 30% कपात करून सौर अक्षय उर्जेवर दिलेला भर, शिवाय साखरेचा हमीभाव 3100 रुपये केला. तो किमान 4000/- रुपये व्हायला हवा. असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतल्यामुळे आम्ही महायुतीला सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चळवळ, आंदोलन याबाबतीतील आमची भूमिका पूर्ववतच राहील असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर समन्वय समिती सदस्य अनिल उर्फ सावकार मादनाईक, प्रदेश कोषाध्यक्ष मिलींद साखरपे, स्वाभिमान पक्ष प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, स्वाभिमानी पक्ष, शिरोळ तालुका अध्यक्षशैलेश आडके, सदस्य सतीश हेगाणा, सागर मादनाईक, वळीवडे करवीर तालुका अध्यक्ष संजय चौगले, करवीर तालुका स्वाभिमानी पक्षाध्यक्ष विलास शामराव पाटील, शहराध्यक्ष पायगोंडा पाटील, अध्यक्ष भोगावती रावसाो बापूसाो डोंगळे यांच्या सह्या आहेत.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना माजी जि.प. बांधकाम सभापती आणि स्वाभिमानीचे समन्वय समिती सदस्य सावकार मादनाईक म्हणाले, आम्ही पदाधिकार्यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, प्रचारात सक्रीय होणार आहोत. गेली 23 वर्षे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली हे कार्यकर्ते बाजूला जाऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वैभव कांबळे हे देखील सोबत असतील. शिरोळ तालुक्यात कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारात सक्रीय होतील. प्रचाराला लागा अशा सूचना दिल्या आहेत.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष असा सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. 20 वर्षापूर्वी स्वाभिमानीची बांधणी केली. चळवळ मजबूत केली. शेतकर्यांचे प्रश्न सहजरित्या सुटावेत हा आमच्या भूमिकेमागचा हेतू आहे. शेतकर्यांच्या उस दराच्या प्रश्नांसदर्भात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे. ऊसदर प्रश्नी मार्ग काढून विषय संपवावा अशी मागणी केली असल्याचेही मादनाईक म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज