शिरोळमध्ये रत्नापाण्णा कुंभार यांच्यानंतर यड्रावकरांना दुसर्यांना आमदार होण्याची संधी : कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत अटीतटीचा मतदार संघ म्हण्ाून शिरोळ मतदार संघाकडे पाहिले जाते. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व आजपर्यंत अनेक मोठमोठ्या नेत्यांनी केले आहे. स्व. रत्नाप्पा कुंभार, दिनकरराव यादव, सा. रे. पाटील, यांचा यामध्ये समावेश आहे. परंतु रत्नाप्पा कुंभार यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याला येथे सलग दुसर्यांदा निवडणूक जिंकता आली नाही. यंदा राजेंद्र पाटील यड्रावकर यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिरोळमध्ये रत्नापाण्णा कुंभार यांच्यानंतर यड्रावकरांना दुसर्यांना आमदार होण्याची संधी
शिरोळचे राजकारण कायम रत्नापाण्णा कुंभार आणि शामराव पाटील यड्रावकर यांच्याभोवतीच फिरत आले आहे. त्यांच्या नंतर आता शामराव पाटील यांचे चिरंजिव राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चांगली पकड या मतदार संघामध्ये निर्माण केली आहे.
शामराव पाटील यड्रावकर यांना कधी आमदार होता आले नाही. परंतु राजेंद्र पाटील यांनी जिद्द सोडली नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उल्हास पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक होते. तिरंगी लढत झाली अन् राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून आले. अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली.
यंदा पुन्हा एकदा राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्या राजश्री शाहू विकास आघाडीच्यावतीने मैदानात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षात केेलेल्या विकासकामाच्या जोरावर ते मतदारासमोर जात आहेत. त्यांना विजयाची खात्री असून, रत्नापाण्णा कुंभार यांच्यानंतर सलग दुसर्यांदा आमदार होण्याची संधी त्यांना निर्माण झाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.