rajkiyalive

shirol vidhansabha news : आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु – राजू शेट्टी

कोल्हापूर :

shirol vidhansabha news : आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु – राजू शेट्टी : ‘स्वाभिमानी’ संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, संघटनेला आवश्यकता वाटली, तर ‘शिरोळ’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे संकेत संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिले.

shirol vidhansabha news : आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु – राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’च्या माध्यमातून सक्षम तिसरा पर्याय दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘कागल’, ‘चंदगड’ व ‘शाहूवाडी’ येथे उमेदवार देणार आहे. ‘शिरोळ’मधून आपल्या नावाची चर्चा आहे, हे खरे आहे. संघटनेला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, त्यास आपण बांधील राहू. संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, त्याच्यासाठी पणाला लागणार असलो तरी हरकत नाही.

सावकारांचा स्वभाव तापट
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांचा स्वभाव काहीसा तापट आहे. ते अजिबात नाराज नसून काही जण चुकीची माहिती बाहेर देत आहेत, हे तुम्हाला लवकरच समजेल, असे शेट्टी यांनी सांगितले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज