shirol vidhansabha news : शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी महायुतीला पाठिंबा : सावकार मादनाईक : चळवळीचे निर्णय वेगळे आणि राजकारणाचे निर्णय वेगळे. हे वारंवार आमचे नेते राजू शेट्टी यांना सांगून देखील त्यांनी दुर्लक्षित केले. त्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी केले.
shirol vidhansabha news : शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी महायुतीला पाठिंबा : सावकार मादनाईक
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ उदगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. कार्यकर्त्यांची मान, प्रतिष्ठा सत्तेत मिळावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत. यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
आमदार यड्रावकर म्हणाले, अनेक वर्षे रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जयसिंगपुरात उभा करण्याचं भाग्य मला मिळालं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरच आगमन सोहळा मोठ्या दिमाखात घडवून आणून सर्वानुमते ठरलेल्या जयसिंग महाराज उद्यानात हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे.
या सभेला सतिश मलमे, शितल गतारे, आक्काताई तेली, ॲड. हिदायत नदाफ, शैलेश आडके, मिलिंद साखरपे, नंदकुमार पाटील आदींनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कुबेर मगदूम, सरपंच सलीम पेंढारी, उपसरपंच अरुण कोळी, जालिंदर ठोमके, संजय चौगुले, बाचू बंडगर, मधुकर निकम, बंटी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.