rajkiyalive

shirol vidhansabha news :घाटगेंच्या पाठिंब्याने यड्रावकरांना हत्तीचे बळ

shirol vidhansabha news :घाटगेंच्या पाठिंब्याने यड्रावकरांना हत्तीचे बळ: शिरोळ विधानसभा मतदार संघातील राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना गुरूदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्याने यड्रावकरांना हत्तीचे बळ आले आहे. माधवराव घाटगे हेही शिरोळ विधानसभा मतदार संघातून भाजपकडून इच्छुक होते. परंतु महायुतीने यड्रावकरांना पाठिंबा दिल्याने माधवराव घाटगे यांनीही देखील मोठ्या मनाने यड्रावकरांना पाठिंबा दिला आहे.

shirol vidhansabha news :घाटगेंच्या पाठिंब्याने यड्रावकरांना हत्तीचे बळ

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाम भारतीय जनता पार्टी व राजश्री शाहू विकास आघाडी एकत्र लढण्याचा निर्धार करून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भाजपच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. आज झालेल्या पत्रकार बैठकीत गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी हा निर्णय जाहीर केला.

घाटगे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे विजय भोजे व मुकुंद गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. महायुतीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे उमेदवार असणार आहेत. महायुतीचे सरकार आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करूया. आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासह इतर निवडणुका भारतीय जनता पार्टी व राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र निवडणूका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रामचंद्र डांगे, मुकुंद गावडे, शिवाजीराव सागले, मिलिंद भिडे, संतोष जाधव महेश देवताळे, रमेश यळगुडकर, राजेंद्र दाईंगडे, पंकज गुरव यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो-जयसिंगपूर येथे पत्रकार बैठकीत बोलताना गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे शेजारी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, रामचंद्र डांगे, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, मुकुंद गावडे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज