rajkiyalive

shirol vidhansabha news : शिरोळमध्ये पुन्हा यड्रावकरच

 shirol vidhansabha news : शिरोळमध्ये पुन्हा यड्रावकरच: शिरोळ विधानसभा मतदारसंघात जात-पात धर्म सर्व बाजूला ठेवत महायुतीचे सहयोगी उमेदवार विद्यमान आमदार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जनतेने पुन्हा निवडून देऊन इतिहास घडविला आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाचे गुराळ झालेल्या मतदारसंघात अखेर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गळ्यातच जनतेने मार टाकली आहे.

shirol vidhansabha news : शिरोळमध्ये पुन्हा यड्रावकरच

या मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर दत्ताचे सर्व गणपतराव पाटील आणि स्वाभिमानीचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह दहा उमेदवार रिंगणात होते एकमेका विरोधी प्रचार करून त्यांनी प्रचारात टिपेला पोहोचविला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी प्रचारादरम्यान झडल्या गेल्या. त्याचबरोबर कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांचा निधीबाबत लेखाजोखा करण्यात आला. तर शेतकर्‍यांचे देणे बुडवणार्‍या साखरसम्राटांचा खरपूस समाचार प्रचारा दरम्यान घेण्यात आला होता.

विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत 1903 कोटी रुपयाचा निधी तालुक्याला आणून तालुक्याचा विकास साधला. यामध्ये रस्ते, गटार, पानंद रस्ते, सांस्कृतिक हॉल बांधणे, तलाव परिसर सुशोभीकरण, पेविंग ब्लॉक बसविणे, यासह नगरपालिकेच्या इमारती बांधणे, मनोरुग्णालय इमारत बांधणे, एसटी स्टँड बांधणे, ओपन जिम त्याचबरोबर शासकीय योजना वैद्यकीय खर्च यासह विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे जनतेसमोर मांडला होता.

तर दत्तचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांनी तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी क्षारपडमुक्त केल्याचा नारा दिला होता. त्याचबरोबर दत्त कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यमान आमदारांच्या कडून राहिलेल्या उणिवा आपल्याला भरून काढायचे आहेत असे त्यांनी प्रचारादरम्यान आवाहन केले होते.

माजी आमदार उल्हास पाटील यांनी आपले पूर्वाश्रमीचे साथीदार राजू शेट्टी यांच्यासोबत युती करून यास या युतीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली होती. कन्यागत महापर्व काळाच्या वेळी आपण आणलेला निधी तालुक्यात खर्च केला असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान जनतेसमोर लेखाजोखा मांडला होता. ठाकरे शिवसेनेने मला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणुकीला सामारे गेलो होतो. गेल्या 35 वर्षापासून मी शेतकर्यांसाठी लढलो आहे. यापुढेही आपण लढत राहणार यासाठी आपण मला साथ द्यावी असे आवाहन केले होते.

आरोप प्रत्यारोपाच्या फैरींमुळे तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते अखेर जात-पात धर्म बाजूला ठेवत जनतेने राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गळ्यात पुन्हा माळ टाकली आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यानंतर सलग दुसर्‍यांदा निवडून येण्याचा मान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पटकावला आहे. तालुक्याच्या विकासासाठी आता निधी कमी पडणार नाही अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

लाडक्या बहिणी पाठीशी…

राज्यात महायुतीचे सरकार असताना लाडक्या बहिणींना महिना पंधराशे रुपये पेन्शन या सरकारने लागू केली होती. त्यानुसार प्रत्येक बहिणीच्या खात्यात किमान साडेसात हजार रुपये जमा झाले. यामुळे या या बहिणींना दिलेला वाटा त्यांनी मताच्या रूपातून आमदार राजेंद्र पाटील यांच्या पदरात टाकल्याचे बोलले जात आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज