rajkiyalive

shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच

shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा आज बुधवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यासाठी सुमारे 141 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मागणी केली होती. ही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही उचलून धरली.

shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच

शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा ;

या मागणीसाठी आंदोलन होऊन भविष्यात काही होण्यापूर्वी उपकेंद्राची घोषणा करण्याची आग्रही मागणी आमदार बाबर यांनी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी घोषणा केली. राज्य सरकारचा हा निर्णय दुष्काळी भागासाठी ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.

पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न उपस्थित

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रही मागणी करीत उपकेंद्र खानापूर येथेच व्हावी, अशी मागणी लावून धरली. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, ही मागणी खूप वर्षापासून प्रलंबीत आहे.

खानापूर येथील जागा हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद

2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. शिवाजी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवला आहे. खानापूर येथील जागा हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. याबाबत जनभावना तीव्र आहेत. भविष्यात आंदोलन होऊन निर्णय होण्यापेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधीमंडळात केली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील ही मागणी लावून धरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहंकाळ या भागातील दुष्काळ हटला आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खानापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी जागा उपलब्ध आहे. लोक यासाठी आंदोलन, बैठका घेत आहेत. त्यामुळे जनभावनेचा विचार करून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, आणि तातडीने त्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करावी, अशी मागणी केली.

shivaji-vidhyapith-news-shivaji-universitys-sub-center-is-in-khanapur

त्यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, ही मागणी शासनाकडे आली आहे. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने पाठवला आहे. जागेची उपलब्धता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिला आहे. यासाठी जवळपास 141 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. ही जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. तसेच केवळ उपकेंद्र करून चालणार नाही, काही पदविका आणि पदव्यूत्तर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी व्हावेत, यासाठी विद्यापीठ पुढे कार्यवाही करेल, अशी घोषणा मंत्री पाटील यांनी केली.

आमदार सुहास बाबर आणि गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी संयुक्त संवाद साधला.

यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी आम्ही आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळात मागणी केली होती. आमच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिसाद देत खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठी मंजूरी दिली. त्यासाठी 141 कोटींच्या निधीची तरतूद केली. खानापूरला गायरान जमिन उपलब्ध आहे. त्याचे अधिगृहन करण्यासाठी त्यांनी मंजूरी दिली आहे.

त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी महत्त्वाची भूमिका घेत घोषणा केली. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.

अमोल बाबरांचे सूचक स्टेटस

युवक नेते अमोल बाबर यांनी काल सोशल मीडियावर बघा उद्या विधानसभेत असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे नेमके काय घडणार ? याची सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राची घोषणा झाली अन छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाबर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.

शब्द भाऊंचा… पूर्तता भैय्यांची

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर व आमदार सुहास बाबर हे पाठपुरावा करत होते. आज आमदार सुहास बाबर यांनी याबाबतची मागणी विधानसभेत केली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा करताच विटा शहरासह खानापूर तालुक्यात बाबर समर्थकांनी जल्लोष केला. विटयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बाबर समर्थकांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाच्या घोषणा दिल्या. आमदार सुहास बाबर व स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे
हे यश मिळाल्याचे बाबर समर्थकांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज