rajkiyalive

सुधीर मुनगंटीवार यांचा सांगलीत सत्कार

सुधीर मुनगंटीवार यांचा सांगलीत सत्कार

सुधीर मुनगंटीवार यांचा सांगलीत सत्कार

जनप्रवास ।  सांगली

विशालगडासाठी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी 1 कोटी 17 लाख रूपये मंजूर केले आहेत, पण सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. मात्र विशालगड नव्हे तर राज्यातील वारसा असलेले सर्व गड जनत करून भगवा फडविण्याचे काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुगनंटीवार यांनी दिली. तसेच प्रतापगडावर लवकरच अफजलखान वधाचे शिल्प उभारून भव्य दिव्य कार्यक्रम केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

 

 

sangli : सुधीर मुनगंटीवार यांचा सांगलीत सत्कार

अफजल खान थडग्याच्या भोवतीचे वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त केल्याबद्दल राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी आमदार व निमंत्रक नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, श्रीकांत शिंदे, स्वाती शिंदे, नीताताई केळकर, पृथ्वीराज पवार, गीतांजली ढोपे-पाटील, महेंद्र चंडाळे, ओंकार शुल्क, अविनाश मोहिते आदी उपस्थित होते.

शिवभक्तांचा संकल्प पूर्णत्वासाठी मी काम करत असतो

ना. सुधीर मुगनंटीवार म्हणाले, शिवभक्तांचा संकल्प पूर्णत्वासाठी मी काम करत असतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण काढण्यासाठी माजी आमदार नितीन शिंदे, मिलिंद एकबोटे यांच्यासह हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून संघर्ष केला होता. हा संघर्ष काही दोन धर्माचा-व्यक्तिचा नव्हता. केवळ दोन विचारांचा होता. एक छत्रपतींचा विचार तर दुसरा विचार राक्षसी प्रवृत्ती, तलवारीच्या जोरावर अत्याचार करणार्‍या अफजल खानाच्या विरोधात होता.

 

दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी 5 नोव्हेंबर 2022 मध्ये पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश

मात्र काही मतांचे लाचार झाल्याने त्या गडावर थडगे व उत्तादीकरण करण्यात आले. मनपेढीपेक्षा त्यांना मतपेढी महत्वाची वाटली. पण आम्ही हिंदू स्वराजाच्या विचाराचे होतो. दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी 5 नोव्हेंबर 2022 मध्ये पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. दोन हजार पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. आता या ठिकाणी अफजलखान वधाचे शिल्प उभारले जाईल. त्याचा कार्यक्रम भव्य दिव्य असा करू, अशी ग्वाही ना. सुधीर मुगनंटीवार यांनी दिली.

हेही आवर्जुून वाचा

100 व्या नाट्यसंमेलनाची सांगलीत मुहुर्तमेढ

http://rajkiyalive.com/sangli-jilhyat-1…sanjaykaka-patil/

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा

दुबईची परिस्थती देखील आता बदलली आहे.

ते म्हणाले, सांगलीचे प्रविण कवठेकर यांनी कॅलेंडर काढले होते. यावर अफजलखान वधाचे छायाचित्र प्रकाशित करून त्यावर दहशतवाद असा संपवावा, असे लिहिले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यावर विधासभेत आवाज उठवला होता. दुबईची परिस्थती देखील आता बदलली आहे. त्या ठिकाणी भगवान महादेवाचे मंदिर उभारले जात आहे. प्रभू रामाचे मंदीर उभारले गेले आहे पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन देखील होणार आहे. हे राज्यासाठी अभियानास्पद आहे. कारण येथील दर

 

विशालगडावरील बेकायदेशीर असलेले 168 खोल्यांचे अतिक्रमण पाडणे आवश्यक

माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, प्रतापगडावर वनखात्याच्या जागेत 19 खोल्यांचे अतिक्रमण करून दर्गा उभारला गेला होता. या ठिकाणी अतिरेकी राहत होते. हे पाडण्यासाठी विधापरिषदेमध्ये आवाज उठवला. आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यानंतर बांधकाम तोडण्याचे आदेश आले. मात्र तत्कालिन मंत्र्यांचे हात मतांसाठी भरभटले होते. त्यानंतर राज्यात हिंदूत्ववादी विचाराचे सरकार आले. ना. सुधीर मुनगंटीवार त्यांनी तातडीने आदेश दिले. त्या ठिकाणची एकवीट देखील शिल्लक राहिली नाही. हे केवळ ना. मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले. आता विशालगडावरील बेकायदेशीर असलेले 168 खोल्यांचे अतिक्रमण पाडणे आवश्यक आहे. हे अतिक्रमण पाडून बाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक बांधावे, अशी मागणी त्यांनी केली.

स्वागत व प्रस्ताविक करताना स्वाती शिंदे म्हणाल्या, राज्यातील 350 गडांपैकी 63 गडांवर अतिक्रमण झाले आहे. हे गड अतिक्रममुक्त केवळ ना. सुधीर मुनगंटीवार काढू शकतात. प्रतापगडाने जसा मोकळा श्वास घेतला आहे. तसा मोकश श्वास इतर गड घेऊ देत, अशी इच्छा व्यक्त केली.

 

अफजलखानचा व्हायसर रोखण्यासाठी वाघनखे राज्यात

राज्यात आजही अफजलखानचा व्हायरस पसरला आहे. काहींच्या डोक्यात घुसलेला हा व्हायरस बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेले वाघनखे दर्शनाखाली राज्यात आणणे महत्वाचे असल्याचे ना. सुधीर मुगनंटीवार यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज