rajkiyalive

sugar cane prise news : हुतात्मा चा पहिला हप्ता 3204 रूपये जाहीर रिकव्हरी पाहून अंतीम दर देणार : वैभव नायकवडी

sugar cane prise news : हुतात्मा चा पहिला हप्ता 3204 रूपये जाहीर रिकव्हरी पाहून अंतीम दर देणार : वैभव नायकवडी : क्रांतीवीर पद्मभूषण डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचा चालू सन 24 / 25 च्या गळीत हंगामातील उसासाठी 3204 रु.प्रतिटन पहिला हप्ता तसेच हंगाम संपल्यानंतर ऊस गाळपाच्या रिकव्हरीनुसार अंतिम दर देणार असल्याची घोषणा चेअरमन वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केली.

sugar cane prise news : हुतात्मा चा पहिला हप्ता 3204 रूपये जाहीर रिकव्हरी पाहून अंतीम दर देणार : वैभव नायकवडी

ते पुढे म्हणाले, कारखान्यांची एफआरपी सतत वाढत असते. परंतु साखरेची एम एस पी मात्र वाढत नाही. एमएसपी वरच ऊसदर अवलंबून असतो म्हणूनच केंद्र व राज्यशासनाने 4200 रुपये एमएसपीसाठी आग्रही भूमिका घेत एमएसपी व एफ आर पी लींक करावी. टेक्स्टाईल नंतर साखर उद्योेग मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा घटक आहे. अलिकडच्या काळात शेतकर्‍यांचा कल द्राक्षबागांकडे आहे. बँकांची कर्जे घेऊन त्यांनी द्राक्षबागा उभारल्या परंतु नैसर्गीक आपत्ती, अतिरिक्त पाऊस यामुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या अशा अनिश्चीत अवस्थेत ऊसपीक हे खात्रीचे पीक आहे .

ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगावरआधारीत छोटे मोठे व्यवसायीक टिकले पाहिजेत तसेच एकूणच साखर उद्योग स्थीर होणे गरजेचे आहे. साखर उद्योगासाठी वित्तीय संस्थांकडून 4 टक्के दराने अर्थ पुरवठा झाला पाहिजे.

चालू हंगामात प्रतिदिन 5100 मे.टन गाळप सुरूअसून, आजअखेर 1 लाख 40 हजार 910 मे.टन गाळप झाले असून सरासरी 11.67% साखर उतारा घेत कारखान्याने 1 लाख 43 हजार 175क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे . यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, चीफ केमिस्ट पाटील, व्यवस्थापक काशिनाथ शेटे, शेती अधिकारी सर्जेराव वावरे , सेक्रेटरी मुकेश पवार उपस्थीत होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज