rajkiyalive

sugar factory news : साखर हंगाम संपताच एफआरपीचा अंतिम फरक द्या

sugar factory news : साखर हंगाम संपताच एफआरपीचा अंतिम फरक द्या  साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांत त्याच हंगामाच्या अंतिम साखर उतार्‍यानुसार अंतिम एफआरपी निश्चित करावी, त्याप्रमाणे फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशा सूचना साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व प्रादेशिक साखर सह संचालकांसह कारखान्यांचे कार्यकारी संचालक व सरव्यवस्थापकांना लेखी आदेशाव्दारे दिल्या आहेत.

sugar factory news : साखर हंगाम संपताच एफआरपीचा अंतिम फरक द्या

साखर आयुक्तांचे कारखान्यांचे लेखी आदेश

साखर कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतरही कारखाने एफआरपीचा अंतिम फरक देण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची लेखी तक्रारी शेतकरी संघटनांकडून साखर आयुक्तांकडून करण्यात आली होती. याबाबतची दखल घेवून साखर आयुक्तांनी एफआरपीतील अंतिम फरकाबाबतचे आदेश काढले आहेत.

विक्रीमुळे साखर उतार्‍यात आलेली घट एकत्रित करून अंतिम साखर उतारा निश्चित करण्यात यावा.

सन 2024-25 मध्ये हंगाम संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत कारखान्यांनी त्या हंगामातील साखर उत्पादनानुसार आलेला प्रत्यक्ष साखर उतारा व इथेनॉल निर्मतिीसाठी उसाचा रस, सिरप व बी हेवी मोलॅसिसच्या वापरामुळे, विक्रीमुळे साखर उतार्‍यात आलेली घट एकत्रित करून अंतिम साखर उतारा निश्चित करण्यात यावा. तसेच त्याप्रमाणे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा अंतिम एफआरपीची रक्कम देण्यात यावी. इथेनॉल निर्मतिीसाठी उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसिसचा वापर केल्यामुळे आलेल्या साखर उतार्‍यातील घट केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या सक्षम संस्थांकडून प्रमाणित करून घेण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

sugar-factory-news-give-the-final-difference-of-frp-as-soon-as-the-sugar-season-ends

कारखान्यांनी या हंगामातील एफआरपी ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना 100 टक्के अदा केल्याबाबत एफआरपी निरंक दाखला मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित प्रादेशिक साखर सह संचालकांमार्फत साखर आयुक्तालयास सादर करावा. एफआरपीची कार्यवाही करत असताना प्रचलित कायदा, नियम आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व साखर कारखान्यांनी दक्षता घ्यावी. अधिनियमातील तरतुदीप्रमाणे दिलेल्या मुदतीमध्ये अंतिम ऊस दर देण्यास विलंब होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी, असेही साखर आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

तरच पुढील वर्षी गाळप परवाना

हंगाम 2024-25 मधील एफआरपी निरंक दाखला प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयातून घेण्यात यावा. तो दाखल मिळाल्यानंतरच साखर कारखान्यांना हंगाम 2025-26 साठी गाळप परवाना देण्यात येईल, असा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज