rajkiyalive

sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार

sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार : एन.डी.पाटील शुगर्स कारखान्यात ऊसगाळपासाठी 3500 हेक्टर नोंदणी झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष गाळपाला सुरवात होणार आहे. ऊस उप्तादक शेतकर्‍यांना विनाकपात व एकरकमी सांगली जिल्ह्यातील उच्चांकी 3300 रुपये दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील व संचालक केदार पाटील यांनी केली. ऊसगाळपानंतर 10 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर ऊसाचे बिल वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार

दत्ताजीराव पाटील, केदार पाटील : सांगली जिल्ह्यात उच्चांकी दराची घोषणा

शकुंतलानगर वाघवाडी ता.वाळवा येथील एन.डी.पाटील शुगर्सच्या बॉयलर अग्नीप्रदीपना नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक मिलिंद पाटील, धनंजय पाटील, मुकुंद पाटील, सर्जेराव बोडरे, समीर तांबोळी, ज्ञानराज निंबाळकर, मिरा निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. चेअरमन दत्ताजीराव पाटील म्हणाले, कारखान्याची गाळपक्षमता 2500 मे.टनाची आहे. सहवीज निर्मितीतून 6 मेगावॅट निर्मिती होणार असून 4.50 मेगावॅट महावितरणाला देणार आहोत. दीड लाख डिस्टलरीची परवानगी मिळाली आहे.वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, कराड, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांची सोय होणार आहे.

उच्चप्रतीचे सॉफ्टवेअर, ऊस उत्पादकांना मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे कारभारात पारदर्शकता ठेवणार आहे.

जन्माने, कर्माने शेतकरी असल्याने शेतकर्‍यांचा आनंद, दुःख, व्यथा, समस्या आम्हाला माहित आहे. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. केदार पाटील म्हणाले, स्व.अ‍ॅड. एन.डी.पाटील यांची प्रेरणा, दत्ताजीराव पाटील यांचा पुढाकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन व बहुमोल सहकार्यातून 125 कोटींच्या एन.डी.पाटील शुगर्सची उभारणी झाली आहे.

शेतकरी हित व रोजगार हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प उभारला आहे.

वाळवा तालुका सुपीक भाग असून ऊसाचे क्षेत्र वाढले परंतू नवीन कारखाना झाला नाही. परिसरातील शेतकर्‍यांना ऊसगाळपासाठी चांगला व सक्षम पर्याय उभारला आहे. अंजली पाटील म्हणाल्या, बेरोजगार व गरजू महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहे. यावेळी शुगर्सचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही वजनकाट्यावर ऊसाचे वजन करा

ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी एन.डी.शुगर्समार्फत तोडणी यंत्रणेची व्यवस्था केली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कोणत्याही वजनकाट्यावर ऊसाचे वजन करुन आणावे. त्यांचा ऊस घेतला जाईल. असे आवाहन चेअरमन दत्ताजीराव पाटील यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज