rajkiyalive

sugarcane prise news : विश्वास कारखान्याचा पहिला हप्ता 3225 रूपये

sugarcane prise news : विश्वास कारखान्याचा पहिला हप्ता 3225 रूपये : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याकडे 2024-25 साठीच्या गळीत हंगामात येणार्‍या उसाला प्रतिटन 3 हजार 225 प्रमाणे पहिला हप्ता देण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

sugarcane prise news : विश्वास कारखान्याचा पहिला हप्ता 3225 रूपये

चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखान्यात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन त्यांनी वरील प्रमाणे दर जाहीर केला. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह संचालक मंडळ व कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, या गळीत हंगामात आम्ही जाहीर केलेला प्रतिटन 3 हजार 225 हा दर आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून जाहीर झालेल्या कारखान्यापैकी सर्वांत जास्त आहे. सध्या कारखान्यात दररोज सुमारे 5 हजार 500 टन क्षमतेने गाळप होत आहे. हंगामात सात लाख टन गाळपाचे उद्दीष्ठ ठेवले आहे. केंद्र सरकारचे साखर कारखानदारीबाबतचे धोरण निश्चित नसल्याने मोठा फटका बसत आहे.

बाजारपेठेत 3 हजार 800 रुपयापर्यंत गेलेले साखरेचे दर आता सुमारे 500 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे उसाला दिला जाणारा दर व साखर निर्मितीस येणारा सर्व बाबींचा खर्चाची विचार करता हा मेळ बसत नाही. त्यामुळे कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या मालकीची कारखानदारी वाचवणे व ऊस शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी साखरेचा दर 4 हजार 200 इतका निश्चित होणे गरजेचे आहे.

ते म्हणाले, ‘विश्वास’ने सातत्याने सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेऊन सर्व घटक सुखी, समाधानी व आनंदी ठेवले आहेत. जास्त ऊस दराची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षीपासून कारखान्यात 105 के. एल. पी. डी. क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. तोडणी-वाहतूक करणारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नोंदी प्रमाणे ऊसतोडणी केली जात आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा. ज्या शेतकर्‍यांनी उद्याप उसाची नोंद केलेली नाही, त्यांनी जवळच्या कारखाना शेती कार्यालयात उसाची नोंद करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज