rajkiyalive

SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा

SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा सांगलीची जागा ताकदीने लढविण्याचा निर्णय

 

 

SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा

जनप्रवास । सांगली :

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. माजी खा. राजू शेट्टी यांनी राज्यात सहा लोकसभा लढविण्याची घोषणा केली आहे, त्यामध्ये सांगली लोकसभेचा समावेश आहे त्यामुळे सांगलीची जागा ताकदीने लढविण्याचा निर्धार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना एक व्होट-एक नोट या पद्धतीने ही निवडणूक लढविणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

 

 

सांगलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पोपट मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांद्रे, राजेंद्र पाटील, रमेश माळी, शिवाजी पाटील, दामाजी दुबल, राजेंद्र माने, भुजंग पाटील, शशिकांत माने, गुलाब यादव उपस्थित होते.

हेही वाचा

RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर

(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…

..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न...

आमच्याकडे पैसे नाहीत मात्र, आमच्या कार्यकर्त्यांकडे हत्तीचे बळ आहे.

महेश खराडे म्हणाले, आमच्याकडे पैसे नाहीत मात्र, आमच्या कार्यकर्त्यांकडे हत्तीचे बळ आहे. त्याच्या जोरावर एक व्होट आणि एक नोट या तत्त्वावर निवडणूक लढविली जाईल. पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढविणार आहे. ही निवडणूक एक व्होट एक नोट या तत्त्वावर लढविण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत फत्तेसिंग गायकवाड 50 हजार, पोपट मोरे 25 हजार, राजेंद्र पाटील 25 हजार, गुलाब यादव व भुजंग पाटील 50 हजार, भागवत जाधव 15 हजार, दिलीप जगताप 10 हजार मदत देणार असल्याचे जाहीर केले.

 

कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची

जिल्हाध्यक्ष पोपट मोरे म्हणाले, निवडणूक सोपी नाही. त्यामुळे सर्वांनी एक दिलाने संघटितपणे निवडणूक लढव. संदीप राजोबा यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची या निर्धाराने कामाला लागण्याचे आवाहन केले. संजय बेले म्हणाले, कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागावे मात्र हे शिवधनुष्य पेलने सोपे नाही. त्यासाठी सर्वांनीच वेळ दिला पाहिजे. राजकीय दबाव झुगारून द्यावा.
या बैठकीला तानाजी साठे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, अशोक खाडे, शशिकांत माने, निशिकांत पोतदार, उत्तम चंदनशिवे, भीमराव निकम, नामदेव लोखंडे, बाबुराव शिंदे, मुकेश पाटील, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, सिकंदर शिकलगार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज