25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
tasgaon crime news : तासगावात चेन स्नॅचिंग करणारा अटकेत : नऊ गुन्हे उघडकीस : तालुक्यासह नऊ ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळण्यात तासगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी, शितल मारुती मिरजे वय-32 (रा.शिंदेवाडी, ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली) यास तासगाव पोलिसांनी अटक करीत तब्ब्ल २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज तासगाव येथील पत्रकार परिषदेत दिली.
tasgaon crime news : तासगावात चेन स्नॅचिंग करणारा अटकेत : नऊ गुन्हे उघडकीस
याबाबत थोडक्यात हकीकत अशी, तासगाव पोलीस ठाणे कडील डीबी पथकातील पोलीस अंमलदार अमर सूर्यवंशी यांना आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तासगाव येथील विटा नाका परिसरात एक व्यक्ती कमी दारात सोने विकणे करता त्याच्या ताब्यातील गाडीवरून संशयितरित्या फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु अन्नछत्रे व डीबी पथकातील अंमलदार अमर सूर्यवंशी, विठ्ठल सानप, विवेक यादव यांनी शहरातील विटा नाका चिंचणी नाका, शिवतीर्थ परिसरात पेट्रोलोलिंग करुन वॉच केला असता शिवतीर्थ ते बापू वाडीकडे जाणाऱ्या रोडवर कोर्ट परिसरात एक इसम त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर संशयितरित्या उभा राहिलेला दिसून आला.
पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व पथकाने संशयितास सापळा रचून ताब्यात घेतले व पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याचे अर्धवट तुटलेले दागिने मिळून आले. त्या दागिन्याविषयी त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने उडवाउडची उत्तरे दिली. त्यावेळी त्याची ओळख विचारले असता त्याने आपण शितल मारुती मिरजे रा.शिंदेवाडी आहे असे सांगितले.
त्याची ताब्यातील मोटरसायकल पहायली असता, ती बजाज कंपनीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टा असलेले पल्सर एन.एस. 200 असून त्यावर (एम.एच. १२ जीसी 7880) असा आरटीओ नंबर दिसला. सदर आरटीओ नंबर ची खात्री केली असता तो आरटीओ नंबर चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातील सोन्याचे अर्धवट तुटलेले दागिने जप्त केले व पंचायत समक्ष त्याशिवासत घेऊन त्याला पुन्हा सोन्याबाबत माहिती विचारले असता त्याने ते सोन्याचे दागिने हे तासगाव पोलीस ठाणे व विटा पोलीस ठाणे हद्दीत 23 जानेवारी 2025 रोजी मोटरसायकल वरून जाता-जाता महिलांच्या गळ्यातील हिसडा मारून दागिने चोरली असल्याचे सांगितले.
त्यावेळी, तासगाव पोलिसांनी शितल मारुती मिरजे यास अटक करून विश्वासात घेत कौशल्यपूर्ण तपासातून तासगाव, विटा, शिरोली एमआयडीसी (जि. कोल्हापूर), कराड ग्रामीण (जि.सातारा), खालापूर (जि. रायगड) पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ९ ठिकाणी चेन स्नॅचिंग गुन्हे उघडकीस आणले. व त्याच्या त्याच्याकडून २८० ग्रॅम, ५६ मिली. वजनाचे २३ लाख ५९२ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २२० व २०० सीसी अशा दोन पल्सर मोटारसायकल त्याची किंमत २ लाख रुपये असा एकूण २५ लाख ५९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
‘डीबी’चा कौशल्यपूर्ण तपास..!
मागील काही दिवसात तासगाव पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे घडले होते. ते गुन्हे उघडकीस आणण्याकरता डीबी पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास सुरू केला होता. यातून, २३ जाने रोजी अत्यंत शिताफीने व चातुर्याने एका संशयिताच्या मुसक्या आवळत तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील ३ व इतर ६ असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले. तासगाव पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने कौतुकास्पद कामगिरी बजावल्याने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत तासगाव पोलिसांचे कौतुक केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.