tasgaon ganpati news : हत्तीवरून मिरवणूक काढल्याप्रकरणी तासगाव गणपती पंचायतनच्या अध्यक्षावर गुन्हा : तासगाव : भोर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विजयानिमित्त 2 फेब्रुवारी रोजी उरावडे(ता. मुळशी ) येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र हत्तीवरून मिरवणूक काढल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वन विभागाने या मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि श्री गणपती पंचायत देवस्थान तासगावचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
tasgaon ganpati news : हत्तीवरून मिरवणूक काढल्याप्रकरणी तासगाव गणपती पंचायतनच्या अध्यक्षावर गुन्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा विधानसभेत विजय झाला. त्यांचे जवळचे मित्र राहुल बलकवडे यांनी आमदार मांडेकर यांच्या विजयानिमित्त 2 फेब्रुवारी रोजी पिरंगुट गावात हत्तीवरून पेढे वाटून जल्लोषाची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीसाठी तासगावच्या श्री गणपती पंचायतन संस्थांचा हत्ती आणण्यात आला होता. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल घेत पुणे जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक यांनी अधिक माहिती घेत आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पिरंगुटचे वनरक्षक एस. व्ही. होले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , 2 फेब्रुवारी रोजी उरावडे ( ता. मुळशी, जि. पुणे) येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. पुणे येथे हत्तीची वाहतूक ही उपवनसंरक्षक सांगली वन विभाग यांच्या परवान्यानुसार करण्यात आली होती. सदर पत्रात नमूद केलेल्या अटी आणि शर्ती यांचे पालन हत्ती वाहतूक करताना अर्जदार आणि मालक यांनी केले नाही. हत्तीचा वापर मिरवणुकीसाठी करून त्याच्यासमोर बँड फटाके वापरण्यात आले.
परवान्यात नमूद अटी आणि शर्ती भंग झाल्यामुळे भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत कलम 49 ए (ए), 51 (1), 57, 50(1), 48(ए) नुसार संयोजक राहुल लक्ष्मण बलकवडे (वय 35 , रा. उरावडे, ता. मुळशी) आणि अध्यक्ष श्री गणपती पंचायतन देवस्थान तासगाव, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वन विभागामार्फत करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या परवानग्या संस्थांनने घेतल्या : पटवर्धन
संस्थांनचा हत्ती कोणत्याही कार्यक्रमासाठी जाणार असेल तर सरकारच्या सर्व परवानग्या घेऊनच आम्ही तो हत्ती पाठवतो. शंकर मांडेकर यांच्या कार्यक्रमासाठी देखील हत्ती जात असताना लागणार्या सर्व परवानग्या आमच्या संस्थांनने घेतल्या होत्या. त्यामुळे आमच्याकडून कोणताही कायदा मोडण्यात आलेला नाही. मात्र ज्या लोकांनी कार्यक्रम आयोजित केला होता, त्या ठिकाणी नियोजनात चूक राहिली असेल तर त्याच्याशी आमचं काही देणंघेणं नाही अशी माहिती राजेंद्र पटवर्धन, अध्यक्ष,श्री गणपती पंचायतन संस्थान तासगाव यांनी दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.