दिनेशकुमार ऐतवडे
tasgaon kavtemankal news : आबांचा गड भेदण्यासाठी काका सज्ज राज्यभरात चर्चेत असणार्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळी तब्बल वीस वर्षांनंतर आबा, काका गट आमने-सामने आले आहेत. यावेळी चौथ्यांदा आबा व काका गटाचा थेट सामना होत आहे. रोहित पाटलांची ही पहिलीच निवडणूक आहे तर काकांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे आबांचा तासगावचा हा गट सहज भेदतील अशी चर्चा मतदार संघात सर्वत्र सुरू आहे.
tasgaon kavtemankal news : आबांचा गड भेदण्यासाठी काका सज्ज
तासगाव तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण होत राहिले. आबा आणि काका गट हेच या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यामुळेच तासगावच्या राजकीय पटलावर अंजनी आणि चिंचणी, अशी दोन राजकीय घराणी सातत्याने एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहेत. 1995 साली काँग्रेसकडून आर. आर. पाटील विधानसभेच्या रिंगणात होते. त्यांच्या विरोधात माजी आमदार दिनकरआबा पाटील रिंगणात उतरले होते. 1999 साली आर. आर. पाटील राष्ट्रवादीकडून, तर काँग्रेसकडून संजयकाका पाटील एकमेकांच्या विरोधात होते. 2004 साली आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील, असाच सामना पहायला मिळाला.
2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंजनी आणि चिंचणीचे मनोमिलन झाल्याचे पहायला मिळाले. बदलत्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय पाटील रिंगणात उतरले आहेत. तब्बल वीस वर्षांनंतर अंजनी विरुद्ध चिंचणी, असा थेट सामना चौथ्यांदा रंगणार आहे. आपल्या मुरब्बी राजकारणात तरबेज असणारे काका सहजरित्या गड भेदतील असे वातावरण सध्या तासगाव मतदार संघात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.