tasgaon -kavtemankhal news : संजय काका पाटील यांचा विजय निश्चित : अजितराव घोरपडे : तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी अजितराव घोरपडे बोलत होते.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजितराव घोरपडे व मान्यवरांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करण्यात आला.
tasgaon -kavtemankhal news : संजय काका पाटील यांचा विजय निश्चित : अजितराव घोरपडे
मी उभा केलेल्या सर्व संस्था व्यवस्थित सुरू आहेत.मात्र विरोध कांच्या सर्व संस्था बंद पडलेल्या आहेत.म्हैशाळ योजनेचे श्रेय लाटत आहेत.यावर मी काहीही बोलणार नाही.मात्र म्हैशाळ योजनेचे काम कोणी केले याचे उत्तर मतदारच तुम्हाला देणार आहेत.असा इशारा अजितराव घोरपडे यांनी दिला.
अजितराव घोरपडे हे स्वाभिमानी व स्वावलंबी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठीशी अजितराव घोरपडे खंबीर उभा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी यांनी केले.
कोंगनोळी पासून मळणगांव पर्यंत व बसाप्पाचीवाडी पर्यंत म्हैशाळ योजनेच्या कालव्याच्या परिसरातील व अग्रणी नदीच्या काठावरील मळणगाव पासून लोणारवाडी पर्यंतच्या परिसरातील पिकांना विचारले तर ती सर्व पिके अजितराव घोरपडे यांचे नांव घेतील.विरोधक मंडळींनी या पिकांना विचारावे असा टोला भाजपा प्रज्ञा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.राजाराम पाटील यांनी मारला.
प्रचार सभेवेळी अशोक काटकर, सुहास भोसले,अजित शिंदे,रमेश कुलकर्णी,प्रकाश शिंदे, मनोज भोसले,सतीश भोसले,विकास मलमे,दिपक गुजले,उत्तम सोनवणे,पी.एस.शिंदे,संपत पवार,निलेश सदामते,मेजर लक्ष्मण मंडले,श्रीपती माळी आदीसह मान्यवर उपस्थित होते.सुहास चव्हाण यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर दत्ताजीराव शिंदे यांनी आभार मानले.
प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी उप सभापती सरिता शिंदे,ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी काटकर व अनिकेत शिंदे,भाग्यश्री सुतार,बळवंत मंडले,साजिद मुलाणी,समीर मुल्ला,हुसेन मुलाणी,राम शिंदे,लक्ष्मण शिंदे, नाना पाटील, केदार चव्हाण आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



