tasgaon-kavtemankhal news : तासगाव कवठेमहांकाळला हा काकांसारखा पाणीदार आमदार: दोन वेळा खासदार राहिलेल्या संजयकाकांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पोहोचवल्याने त्यांना पाणीदार खासदार म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देेणार्या काकांना आता आपल्या तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याकडे हक्काने पाहता येणार आहे. कायमच दुष्काळी कलंक असलेल्या या मतदार संघात पाणीदार आमदार काकांच्या रूपाने मतदार पहात आहेत.
tasgaon-kavtemankhal news : तासगाव कवठेमहांकाळला हा काकांसारखा पाणीदार आमदार
खासदार संजय काका पाटील हे एक अविरत चालणारे अग्निकुंड आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जनसेवेसाठी, लोकसेवेसाठी रात्रंदिवस अविरत कार्यरत राहून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काकांनी स्वताला वाहून घेतलेले आहे. खासदार असताना सर्वप्रथम त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा बिमोड करणेसाठी आपले दंड थोपटले. टेंभू उपसा सिंचन योजनेचा चौथा टप्पा पुर्णत्वाकडे, म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता, जत विस्तारीत म्हैसाळ योजनेसाठी पाठपुरावा या कामांमुळेच काकांना जनतेनेच ’पाणीदार खासदार’ बिरुदाली दिली. दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यातून मिळालेले समाधान त्यांचे डोळ्यात नेहमीच तरळत असते.
राजकारणी आहेत म्हणल्यावर विरोध होणारच, परंतु कोणत्याही टिकेला न जुमानता जनतेच्या आणि मतदारसंघाच्या विकासाच्या राजकारणावर भर देणार्या नेत्यांच्या रांगेत काका केव्हाच पोहचलेले आहेत.
काकांनी नेहमीच सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यातील मंत्र्यांकडे तसेच केंद्रातील मंत्र्यांकडे केलेल्या विकासकामांचा नेहमीच पाठपुरावा ते करीत असतात. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कोट्यवधींचा निधी अक्षरश: खेचून आणला आहे आणि विकासकामांना गती मिळवून दिली. जिल्ह्यातील दळणवळण सुलभ करण्यासाठी सुरुवातीलाच पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्ग दुपदरीकरण, 3 राष्ट्रीय महामार्ग, पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर, ड्रायपोर्ट अशी विकासकामे मंजूर करुन महत्वाचे माईलस्टोन काकांनी केव्हाच पार केलेले आहेत. एवढी विकासकामे पुर्णत्वाकडे घेवून चाललेला विकासपुरुष आपल्या जिल्ह्याला अजून प्रगतीपथावर घेवून जाईल यात काहीच शंका नाही.
दुष्काळी भागातील शेतकर्यांसाठी संघर्ष करणारा नेता ते दुष्काळ संपवण्यासाठी पाणी योजनांचे जिल्ह्यात जाळे तयार करुन शेतकर्यांना समाधान देणारा पाणीदार नेता असा काकांचा प्रवास थक्क करणारा आहे.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाला आता अनुभवी आणि आक्रमक आमदार हवा आहे. मतदार काकांच्या रूपाने नवीन आमदार पहात आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



