rajkiyalive

tasgaon-kavtemankhal vidhansabha : सरकारांच्या मदतीने संजयकाका प्लसमध्ये

tasgaon-kavtemankhal vidhansabha : सरकारांच्या मदतीने संजयकाका प्लसमध्ये : तासगाव विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजयकाका पाटील हे 2004 नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 1999 आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 2009 मध्ये मतदार संघ बदलले आणि तासगाव आणि कवठेमहांकाळ असा नवा मतदार संघ निर्माण झाला. यातील वैशिष्ट्य म्हणजे अजितराव घोरपडे सरकार यांचे पाठबळ संजयकाकांना मिळणार आहे.

tasgaon-kavtemankhal vidhansabha : सरकारांच्या मदतीने संजयकाका प्लसमध्ये

1990, 1995 आणि 1999 अशी तीन टर्म अजितराव घोरपडेंनी आमदारकी भोगली आहे. कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडेंचा मोठा गट असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. 2009 मध्ये मतदार संघांची पुनर्रंचना झाली. त्यामध्ये कवठेमहांकाळ मतदार संघ रद्द झाला. त्यामूळे घोरपडेंना मतदार संघ राहिला नाही. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आर. आर. पाटील यांना पाठिंबा दिला.

2014 मध्ये त्यांनी भाजपकडून विधानसभा लढवली. त्यावेळी त्यांच्या विरोधात आर. आर. पाटील उभे होते. राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील यांना 108310 मते मिळाली तर भाजपच्या अजितराव घोरपडेंना 85900 मध्ये मिळाली. 23 हजार मतांनी घोरपडेेंचा पराभव झाला. यावेळी संजयकाका पाटील भाजपकडून खासदार होते. त्यावेळी खासदारही आमचाच आण्ि आमदारही आमदाचा या ध्येयाने आर. आर. पाटील विजयी झाले.

पुढे 2019 मध्ये पुन्हा एकदा अजितराव घोरपडे विधानसभेच्या मैदानात उतरले त्यावेळी ते शिवसेनेकडून मैदानात होते. समोर होत्या राष्ट्रवादीच्या सुमन पाटील. यावेळीही सुमन पाटील यांना 128371 मते मिळाली तर घोरपडेंना 65839 मते मिळाली. यावेळीही खासदारही आमचाच आणि आमदारही आमचाच यामुळे सुमन पाटील यांना भरघोष मते मिळाली.

यंदा पुन्हा एकदा आबा काका गट सामने आले आहेत. यंदा भर आहे ती अजितराव घोरपडेंची. गेल्या दोन निवडणुकीतील आकडेवारी पाहिली असता घोरपडेंना 65 हजार ते 85 हजार मते पडली आहेत. आता स्वत: संजयकाका पाटील मैदानात आहेत. तासगाव तालुक्यात काका आणि कवठेमहांकाळमध्ये घोरपडें सरकारांच्या वर्चस्वामुळे काकांची गाडी सुसाट सुटली आहे. सरकारांच्या मदतीने काका प्लसमध्ये असल्याची चर्चा आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज