tasgaon news : कवठेमंकाळच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय काकांना ताकद देऊया: राजवर्धन घोरपडे : तुम्ही दिलेल्या एका मतांमध्ये मध्ये दोन आमदार आपल्या मतदारसंघाला मिळणार आहेत. गेली पंधरा वर्षे कवठेमंकाळ तालुक्याला विकासाचा जो बॅकलॉग पडला आहे तो भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी ताकतीने संजय काकांच्या पाठीमागे राहूया असे आवाहन युवा नेते राजवर्धन घोरपडे यांनी केले.
tasgaon news : कवठेमंकाळच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय काकांना ताकद देऊया: राजवर्धन घोरपडे
तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचे महायुतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आगळगाव येथे झालेल्या सभेत राजवर्धन घोरपडे बोलत होते. कवठेमंकाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून सुरू असणार्या गावागावातील प्रचार सभेत संजय काकांना मिळणारा प्रतिसाद हा उत्स्फूर्त आहे.
यावेळी बोलताना राजवर्धन घोरपडे म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी संजय काकांसाठी तासगाव येथे झालेल्या प्रचार सभेत कवठेमंकाळ तालुक्याला दुसरा आमदार देणार असल्याचे स्वयंस्फूर्तीने जाहीर केले आहे. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात दोन आमदार मिळाल्यामुळे दोन्ही तालुक्यांचा झपाट्याने विकास होणार आहे. कवठेमंकाळ तालुक्यात गेली पंधरा वर्षे केवळ भावनिकतेंचे व गोड बोलून राजकारण सुरू आहे. त्यामुळे कवठेमंकाळ तालुक्याचा जर विकास व्हायचा असेल तर संजय काकांना ताकद द्यायची अशी भूमिका अजितराव घोरपडे सरकार यांनी घेतली आहे त्यामुळे आपण सर्वांनी काकांच्या पाठीमागे ताकतीने राहूया असे आवाहन हीं यावेळी राजवर्धन घोरपडे यांनी केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील म्हणाले , अजितराव घोरपडे सरकार यांनी प्रयत्नपूर्वक ताकत लावून कवठेमंकाळ तालुक्यात पाणी आणले. केंद्रातून राज्यात पाठपुरावा करून योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र काही जण भगीरथ असल्याचा आव आणत आपणच पाणी आणल्याचे श्र सांगत फिरत आहेत. विस्तारित टेंभू योजनेचा आराखडा घेऊन वायफळे तालुका तासगाव येथे शेतकर्यांची मीटिंग घेतली यावेळी अधिकारी उपस्थित होते
त्यावेळी काही दिवसात विस्तारित टेंभूची सुप्रमा मिळणार असल्याचे आम्ही जाहीर केले. लगेच हा गडी सांगलीत जाऊन उपोषणाला बसला. दीड दिवसाच्या उपोषणाने पाणी मिळाल्याचे सांगायला सुरुवात केली. जर दीड दिवसाचे उपोषणाने पाणी मिळत असेल तर 35 वर्षे आपल्या वडिलांनी काय केले पस्तीस वर्षात तुम्ही का पाणी आणू शकला नाही असा सवाल संजय काका पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
गेली पंधरा वर्षे कवठेमंकाळ तालुक्याची फसवणूक करण्यात जी मंडळी होती तीच आता पुन्हा एकदा संधी मागत आहेत. मात्र कवठेमंकाळ तालुक्याची जनता सुज्ञ आहे. कवठेमंकाळ तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन यावेळी संजय पाटील यांनी केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.