rajkiyalive

tasgaon vidhansabha news :संजयकाका म्हणजे पोराची उमेदवारी हिसकावून घेणारा ययाती राजा: खासदार विशाल पाटील यांनी संजय काकांवर डागली तोफ,

ढवळी येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ

जनप्रवास तासगाव:
tasgaon vidhansabha news :संजयकाका म्हणजे पोराची उमेदवारी हिसकावून घेणारा ययाती राजा: खासदार विशाल पाटील यांनी संजय काकांवर डागली तोफ, : देवधर्माचा नाद असणार्‍या माणसांनी त्यागाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. पाच वर्षे भावी आमदार म्हणून पोराला फिरवले व ऐनवेळी तुम्ही उमेदवार झालात जो पोराचा झाला नाही तो जनतेचा कसा होऊ शकतो. पोराची उमेदवारी हिसकून घेणारा ययाती राजा म्हणजे संजय काका अशी तोफ खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर डागली. ते ढवळी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील रोहित पाटील यांसह तासगाव कवठेमंकाळ मतदारसघातील पदाधिकारी उपस्थित होते.

tasgaon vidhansabha news :संजयकाका म्हणजे पोराची उमेदवारी हिसकावून घेणारा ययाती राजा: खासदार विशाल पाटील यांनी संजय काकांवर डागली तोफ,

यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की बाप नसल्याचे दुःख काय असते हे मला माहित आहे. गेले 21 वर्षे मला जाणीवपूर्वक पुढे येऊ दिले नाही. मात्र लोकसभेला जनतेन निवडणूक हातात घेतली मी नेत्यांच्या विश्वासावर राहिलो असतो तर मला कावळा शिवायचा राहिला असता. गेल्या दहा वर्षात तुमच्या खासदाराने तासगाव हा शब्द कधी संसदेत बोलला नाही. कालचे भाषण अजित दादांनी कोणासाठी केलं हे मला कळालं नाही. आबा जाऊन नऊ वर्षे झाली मात्र आत्ताच त्यांनी हे का बोलले माणूस गेला की वाद संपतो ही आपली संस्कृती मात्र त्यांच्या मुलाला पाडण्यासाठी कोण उमेदवार मिळेना म्हणून जनतेने नाकारलेल्या उमेदवार तुम्ही दिली.

यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की तासगाव शहरात आसपास तुम्ही फिरला प्रत्येक सातबार्‍यावर व संजय काका यांचा नावाचा उल्लेख आढळतो ही गुंडगिरीच आहे मदत करणार्‍याच्या मूडक्यावर ते पहिल्यांदा पाय ठेवतात याचा अनुभव लवकरच अजित दादांना येईल असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की तासगाव तालुक्याच्या सर्व क्षेत्रात मी काम केले. 35 वर्षे तुम्ही काय केले असा प्रश्न विचारणार्‍यांनी 35 वर्षे जनतेने तुम्हाला का नाकारले हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारावा असे आव्हान दिले. येत्या पाच वर्षात महिला व तरुणींसाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये कोडींग क्लासेस संकल्पना राबवणार आहे. तसेच मुलींच्या आरोग्यासाठी एच पी व्ही ही लस या मतदारसंघातील मुलींना देणार असून ते देणारा हा मतदारसंघ भारतातील एकमेव असेल.

पाणी योजनांची थट्टा करणारे पाईपलाईन मध्ये उंदीर खेळतील म्हणणारे आता पाणी पोहोचायच्या आत नारळ घेऊन पाणी पुजायला धावतात. नारळाचे पाणी पुढे गेले, शेतकर्‍याला कमी पण व्हाट्सअप वर पाणी जास्त आले. लोकांची थट्टा तुम्ही केली आहे. एमआयडीसीला ही विरोध तुम्हीच केला दहा वर्षे तुम्हाला संधी देऊनही बोलला नाही मात्र मी बोलतो म्हणून लोक मला स्वीकारतात या मतदारसंघाचे राजकारण यापुढे फक्त विकासावर होईल याची काळजी घ्या असा इशारा त्यांनी दिला.

कालच्या सभेत मला बाळ म्हणून संबोधनार्‍यानी तुमच्या बाळाला का माघार घ्यावी लागली पक्ष नेतृत्वाला उमेदवार का बदलावा लागला हे फक्त सांगावे अशी खोचक टीका केली. हे त्या पाच वर्षात बाजार समितीची इमारत पूर्ण होईल त्या ठिकाणी द्राक्षांची सौदे चालू करणार असून तासगाव येथे पाच कोटींची माती, पाणी व काडी परीक्षण करणारे अत्याधुनिकला ल्याब उभा राहणार आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान सभेवेळी मशिदीवर अजाण चालू होते यावेळी रोहित पाटील यांनी आपले भाषण थांबवल्याने तो सभास्थळी चर्चेचा विषय होता.

क्रेडिट मिळेना म्हणून लोकांच्या अंगावर: विशाल पाटील

नितीन गडकरींनी सांगितले तासगावच्या रिंग रोडचा प्रश्न रोहित व आमदार कसुमनताई यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला. तासगावची नगरपालिका इमारत सुमनताई यांच्या पाठपुरावा व निधीमुळे झाली. मात्र त्या इमारतीचे क्रेडिट मिळणे म्हणून माजी खासदार हे लोकांच्या अंगावर धावून चाललेत अशी कोपरखळी खासदार विशाल पाटील यांनी संजय काकांना मारली.

तुम्हाला सोसणार नाही: रोहित पाटील

कालच्या सभेत काही लोकांनी मला बोलका पोपट म्हणून माजी माप काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मी विकासावर लोकांना मत मागतोय. तुमच्या व्यंगावर बोललो तर ते तुम्हाला सोसणार नाही, ती माझी संस्कृती नाही यामुळे तुम्ही यापुढे काळजी घ्या असा इशारा त्यांनी संजय काका पाटील यांना दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज