मुंबई :
’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता पाच एकरपेक्षा जास्त जमिनदारांनाही मिळणार ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे. काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे.
’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता पाच एकरपेक्षा जास्त जमिनदारांनाही मिळणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. त्यामधील दोन नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे.
कोणते 2 बदल करण्यात आले ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणार्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता कऱण्यात आली आहे. वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे.
त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.
इतर अटी खालीलप्रमाणे
– लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावे.
– लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
– राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला.
– योजनेचा लाभ वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळेल.
– योजनेच्या लाभासाठी अर्ज करणार्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक.
– ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे, अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे,
1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.
4) सक्षम प्राधिकार्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?
योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.
भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचार्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



