rajkiyalive

sangli gbs news : ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’चा सांगलीत शिरकाव चिंतामणीनगरासह तीन रूग्ण आढळले

sangli gbs news : ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’चा सांगलीत शिरकाव चिंतामणीनगरासह तीन रूग्ण आढळले: पुणे शहरात वेगाने पसरत असलेल्या गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ने आता सांगलीत शिरकाव केला आहे. सांगलीत येथील चिंतामणीनगर, मर्दवाडी (ता.वाळवा) तर गुडमूडशिंगी (कोल्हापूर) येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. या तिन्ही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

sangli gbs news : ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’चा सांगलीत शिरकाव चिंतामणीनगरासह तीन रूग्ण आढळले

इलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच त्याच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हाता-पायांतली ताकद नष्ट होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे अर्धांगवायू किंवा पक्षाघातापर्यंत पोहोचू शकतात. आधी पाय नंतर हात आणि हळूहळू इतर अवयवांतील ताकद नष्ट होऊ लागते. बोलताना, गिळताना तसेच श्वास घेताना त्रास होतो. वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे असून उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात.

पुणे शहरात या आजाराचे झपाट्याने रूग्ण आढळून येत आहेत. सांगलीत देखील तीन रूग्ण आढळून आले आहेत. चिंतामणीनगर येथील रुग्ण काही दिवसांपूर्वी अजमेर, आग्रा येथे गेला होता. त्यांना प्रवासाची हिस्ट्री आहे. या पार्श्वभूमीवर चिंतामणीनगर येथे महापालिकेने दोन दिवसात चारशे घरांचे सर्वेक्षण केले. यात एकही जीबीएसचा रुग्ण आढळला नाहीत. जे तीन रुग्ण उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. या रुग्णांना अशक्तपणा, हाता-पायाचे स्नायू दुखणे आदी लक्षणे होती. नागरिकांनी घाबरुन न जाता या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत असे अवाहन डॉ. वैभव पाटील यांनी केले आहे.

रूग्णांना जाणवणारी लक्षणे

* हात, पाय, घोटे किंवा मनगटात मुंग्या येणे
* पायांमध्ये कमकुवतपणा
* चालण्यात अशक्तपणा, पायर्‍या चढण्यास त्रास
* बोलण्यात अन्न चावण्यात किंवा गिळण्यात अडचण
* तीव्र वेदना, विशेषत: तीव्र स्नायू वेदना
* श्वास घेण्यास त्रास होणे

रूग्णांनी ही काळजी घ्यावी

* पिण्याचे पाणी शुध्द असावे, पाणी उकळून घ्यावे
* अन्न स्वच्छ आणि ताजे असावे
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा
* शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेऊ नये
* लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज