uday savant news : हळद संशोधनचे सांगलीत उपकेंद्र उभारणार: ना. उदय सामंत: सांगलीत हळदीचा उद्योग मोठा आहे. वसमत (जि. हिगोंली) येथे हळद संशोधन केंद्र सुरू आहे. त्याचे उपकेंद्र सांगलीत सुरू करू. त्यासाठी लवकरच सांगलीत अधिकारी व व्यापार्यांची बैठक घेऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
uday savant news : हळद संशोधनचे सांगलीत उपकेंद्र उभारणार: ना. उदय सामंत
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने येथील न्यू प्राईड हॉटेलमध्ये पश्चिम महाराष्ट्राची उद्योग-व्यापार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. या परिषदेेला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री, आ. जयंत पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाकांत मालू, प्रविण लुंकड, नीता केळकर आदी उपस्थित होते.
सांगलीत हळद संशोधन उपकेंद्र होणे गरजेचे आहे.
ना. उदय सामंत पुढे म्हणाले, सांगलीला हळदनगरी म्हणून ओळखले जाते. हळदीची मोठ्या प्रमाणात निर्याद देखील होते. त्यामुळे सांगलीत हळद संशोधन उपकेंद्र होणे गरजेचे आहे. वसमत येथे हळद संशोधन केंद्र उभारण्यास आले आहे. आमदार हेमंत पाटील हे अध्यक्ष असून त्यांनी सांगलीला उपकेंद्र मंजूर करण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. ते पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे म्हसवडमध्ये साडेतीन हजार एकर जागा संपादीत करून एमआयडीसी उभारली जाणार आहे. सांगलीत जर जागा देणारे शेतकरी असतील एमआयडीसी करता येईल. एखादा प्रकल्प उभारताना त्याचे समर्थन करणार्या समिती ऐवजी बर्याच ठिकाणी संघर्ष समिती स्थापन होते. चांगल्या प्रकल्पांना समर्थन दिले पाहिजे. डिफेन्सचे प्रकल्प काही ठिकाणी उभारले जाणार आहेत.
सांगलीत देखील हा प्रकल्प उभारण्यासाठी बैठक घेतली जाईल.
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील जे प्रश्न आहेत ते टप्प्याटप्प्याने सोडवली जातील. जिल्ह्याच्या उद्योगाला किर्लोस्कर यांनी ताकद दिली. नव्याने सुरू होणार्या उद्योगाला सर्वांनी समर्थन करण्याची गरज आहे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळून रोजगार उपलब्ध होईल. दावोस येथील परिषदेतून महाराष्ट्रात 15 लाख 70 हजार कोटी रूपये गुंतवणूकीचा निर्णय झाला. येत्या तीन वर्षात त्यातून किमान 12 लाख कोटींची शाश्वत गुंतवणूक महाराष्ट्रात होऊन 10 ते 12 लाख जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सध्याच्या काळात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टीकल ज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात इंडस्ट्रीजसाठी ज्या कौशल्याचे मनुष्यबळ हवे असेल त्याप्रमाणे कौशल्याचे मनुष्यबळ देण्यासाठी आवश्यक कोर्स सुरू करण्याचा प्रयत्न असेल.
एमआयडीसीमधील अनेक उद्योजकांनी रस्त्यांचा प्रश्न मांडला,
तत्कलिन सांगली व मिरज नगरपालिकेने एमआयडीसीमधील रस्ते का घेतले नाहीत? याचे कारण माहिती नाही. पण आता रस्त्यांबाबत पाठपुरावा करू. शिवाय उद्योगमंत्री सामंत यांनी परिषदेत ज्या घोषणा केल्या आहेत. त्याचा पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करून व जिल्ह्यात जास्तीत जास्त उद्योगवाढीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
ललित गांधी म्हणाले, अनेक जिल्ह्यात उद्योग मित्र समितीची बैठक होत नाही.
काही जिल्हाधिकारी बैठकांना उपस्थित राहत नाही. केवळ औपचारिकपणे बैठका घेतल्या जातात. स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत. परंतू जिल्हाधिकारी हजार राहत नसल्यामुळे निर्णय होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात या बैठक नियमित होण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी केली. शिवाय दावोस येथे 16 लाख कोटी गुंतवणुकीचे करार केले आहेत. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात छोटे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असावे.
यावेळी ललित गांधी, रवींद्र माणगावे, नीता केळकर, प्रवीण लुंकड यांनी उद्योजक, व्यापारी यांच्यापुढील अडचणी मांडून उपाय सूचविले. या परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य रमेश आरवाडे, संजय अराणके, उद्योजक रौनक शहा, भालचंद्र पाटील,सर्जेराव नलवडे, प्रकाश शहा, चेतन चव्हाण, अर्चना पवार, सचिन घेवारे आदी पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी उपस्थित होते.
तरच सांगलीला विमानतळ होईल….
निवडणुकीच्या काळात राजकारण आणि निवडणुका झाल्या की सर्वजण विकास कामासाठी सर्वांनी एकत्र येणे अपेक्षित असते. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले तर मग विकासाच्या गोष्टी मागे पडतात. उद्योजकांनी सांगलीत एअर स्ट्रीपची मागणी केली आहे. परंतू आता एअरस्ट्रीपबाबत नियम बदलले आहेत. उद्योजकांच्या भावना समजू शकतो. जर एअर स्ट्रीपबाबत लांबी, रूंदीबाबत तसेच रडारबाबत सुविधा झाली तर सांगलीत चांगले विमानतळ होऊ शकते, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



