rajkiyalive

यूएसके ऍग्रोचे संचालक, उद्योजक संभाजी चव्हाण यांचे अपघातात निधन

यूएसके ऍग्रोचे संचालक, उद्योजक संभाजी चव्हाण यांचे अपघातात निधन

जनप्रवास तासगाव :
यूएसके ऍग्रोचे संचालक, उद्योजक संभाजी चव्हाण यांचे अपघातात निधन: तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडीचे सुपुत्र तथा युएसके ऍग्रोचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण यांचे आज दुपारी भीषण अपघातात निधन झाले. जत वरून सिद्धेवाडी या आपल्या मूळ गावी यात्रेसाठी येत असताना कुंभारवाडी जवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यूएसके ऍग्रोचे संचालक, उद्योजक संभाजी चव्हाण यांचे अपघातात निधन

चारचाकी गाडीचा भीषण अपघात : कुंभारवाडी जवळील घटना

याबाबत माहिती अशी : संभाजी चव्हाण हे आज सकाळी कामानिमित्त जत भागात गेले होते. तेथील काम उरकल्यानंतर ते आपल्या सिद्धेवाडी या गावाकडे येत होते. सिद्धेवाडी येथील आज यात्रा असल्याने ते यात्रेसाठी गावाकडे येणार होते. आपल्या स्विफ्ट या गाडीतून ते गावाकडे येत होते.

कुंभारवाडी जवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या गाडीला त्यांची धडक झाली.

अपघातात स्विफ्ट या गाडीचा चक्काचूर झाला आहे. त्यातच चव्हाण यांनी गाडीचा सीट बेल्ट न लावल्याने गाडीच्या एअर बॅग बाहेर आल्या नाहीत. परिणामी गाडीने दोन – तीन पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.चव्हाण हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. आपले मित्र रमाकांत यांच्यासोबत त्यांनी यु एस के ऍग्रो या फर्मची स्थापना केली. अतिशय दर्जेदार शेती औषधे या कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून चव्हाण यांनी खडतर परिश्रम घेत यशस्वी उद्योजक होण्याची किमया केली होती.

त्यांच्या अपघाताची बातमी वार्‍यासारखी जिल्ह्यात पसरली.

गावाकडील अनेक लोक अपघातस्थळी दाखल झाले. कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शिवविच्छेदन करण्यात आले. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज