rajkiyalive

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी : हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्यात वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. या मतदार संघात कधी नव्हे ते चुरस पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे सत्यजित आबा सरूडकर, महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डि. सी. पाटील यांच्यात चौरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वडगाव येथील सभेने कार्यकर्ते रिचार्ज झाले असून, त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

 

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी

मतदार संघातील प्रत्येक गावात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना माणनारा मोठा गट आहे. त्यामुळे प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची शाखा उघडण्यात आली आहे. त्या शाखेच्या माध्यमातून कार्यकर्ते प्रचाराची धुरा अंगावर घेतले आहेत. बुधवारी वडगावमध्ये वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची जंगी सभा झाली या सभेमध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा सांगितला. सभेनंतर गावोगावी प्रचारयंत्रणा जोरदार राबविण्या सुरूवात झाली आहे.

सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील स्वयं घोषित नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो,2024ची लोकसभा निवडणुक ही ,आलुतेदार आणि बलुतेदार या अठरा पगड जातीच्या स्वाभिमानाची आणि स्वतः ला सार्थ अभिमान वाटावा अशी मनोमन भूमिका घेऊन मतदान करण्याची आहे. एकूनच महाराष्ट्रातील राजकीय सारीपाटावर आंबेडकरी अस्तित्व सिद्ध करण्याची आहे .

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षाची लोक तुम्हाला सांगणार तुमचा उमेदवार निवडून येणार नाही मग तुमचं मत फुकट घालवू नका, महाविकास आघाडीला मतदान करून, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी मतदान करा पण, मित्रांनो अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, अठरापगड जातींच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. त्यांना आपण भरघोस मतदान करून भाजपा आणि महाविकास आघाडीला पराभूत करून वंचितांची सत्ता आणुया, ज्या प्रकारे गावगुंड, गावातील नेते आबा, दादा, तात्या जसे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांला, ग्रामपंचायत निवडणुकीत डावलून आंबेडकरी समाजातील मान डोलावणारा, एखादा सांगकाम्याला निवडणुकीत निवडून आणतात आणि कायद्याचे ज्ञान असणारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला जसं हे डावलण्यात येते .

त्याच प्रकारे आमच्या नेतृत्वाला अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना डावलण्यात आले आहे, पण त्यांना माहितच नाही की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वाभिमानी रक्ताचे, विचारांचे नेतृत्व अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर आहेत, आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सर्वांनी कोणी काही म्हणो, परंतु आंबेडकरी आणि,बाण,शान जपण्यासाठी ऋदेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकमताने, एकदिलाने वंचित बहुजन आघाडीला विजयी करूया.

जिल्हा सचिव कोल्हापूर जिल्हा
अशोक केशव गायकवाड
मु पो आकुर्ळे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज