अॅड. आंबेडकर सभा घेणार ; विशाल पाटलांना हत्तीचे बळ
जनप्रवास । प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचा विशाल पाटील यांना पाठिंबा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटील यांना दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंतदादांच्या नातवांसाठी मैदानात उतरले असून, विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सांगलीत सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचा विशाल पाटील यांना पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीचा विशाल पाटील यांना पाठिंबा : सोमनाथ साळुंखे म्हणाले की, भाजप सरकारमुळे सर्व घटकांचे आरक्षण धोक्यात आले आहे. शेतकर्यांचे प्रश्न सुटलेले नाही. शेतमजूर, कामगार, नवयुवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. युवकांच्या नोकरींचा प्रश्न गंभीर झाला आहे. देशात जनतेचे प्रश्न असताना भाजपकडून मात्र मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. भाजपचा पराभव करणे हेच वंचित आघाडीचे उद्दीष्ट आहे. सांगलीत विशाल पाटील हेच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात. त्यासाठी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रीय होणार आहेत.
संविधान वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे.
माजी राज्यमंत्री प्रतीक पाटील म्हणाले की, वसंतदादा आणि आंबेडकर यांचे जुने संबंध आहेत. संविधान वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. भाजपविरोधी लढ्यात प्रकाश आंबेडकर यांनी विशालदादांना साथ द्यावी, त्यांच्या पाठिशी रहावे, यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यांनीही त्याला प्रतिसाद देत विशालदादांना पाठिंबा दिला आहे. विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यामुळे हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
यावेळी युवा अध्यक्ष इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, राजू मुलाणी, स्वप्निल खांडेकर, नजीर झारी, शहराध्यक्ष इरफान केडीया, जिल्हा महासचिव नवीनकुमार कांबळे, मिलिंद कांबळे, मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



