rajkiyalive

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

दिनेशकुमार ऐतवडे,

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल : हातकणंगले लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डि. सी. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केल्याने वंचित आघाडीही आता निवडणुकीच्या मध्यभागी आली आहे.

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

गेल्या पंचवार्षिकमध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांनी 1 लाख 27 हजार मते खाल्ली होती. त्याचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना बसला होता. सांगली लोकसभा मतदार संघातही वंचितचे गोपीचंद पडळकर यांनीही 3 लाखावर मते घेतल्याने सांगलीत स्वाभिमानीचे विशाल पाटील यांनाही पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे वंचित आघाडीचा धसका सर्वांनीच घेतला होता.
यंदा वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंग समोर ठेवून सर्वच समाजाला समान संधी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले लोकसभा मतदार संघात डि. सी. पाटील यांची उमेदवारी त्यांनी जाहिर केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदा कधी नव्हे ती चुरस पहायला मिळणार आहे.

महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डि. सी. पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आहे. अजून आवाडे घराण्याने पत्ते ख्ाुले केले नाहीत. त्यांच्या निर्णयावरही बरेच काही अवलंबून असले तर यंदा खरी चर्चा सुरू झाली आहे ती वंचितच्या उमेदवाराची. गेल्या निवडणुकीत वंचितने राजू शेटृींची विकेट काढली होती. यंदा वंचितच्या जाळ्यात कोण कोण अडकेत याचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=lZQTkJWTcmw

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथील दादासाहेब पाटील उर्फ डि. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

जैन समाजाचे असलेल्या डि. सी. पाटील यांनी या अगोदर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. कुंभोज येथील बाहुबली आश्रमचे ते विद्यमान महामंत्री आहेत. कुंभोज परिसरात त्यांचे मोठे नेटवर्क तर आहेच. परंतु इस्लामपूर मतदार संघातही त्यांचे पै पाहुण्यांचे सर्कल आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात जैन समाजाचे दीड लाख मतदार असून, आंबेडकर विचारांचे सुमारे अडीच लाख मतदान आहे. गेल्या पाच वर्षात आंबेडकर चळवळ जागृत झाली आहे. या भागात रामदास आठवले यांच्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. डि. सी. पाटील आणि प्रकाश आवाडे यांचेही घरगुती संबंध आहेत.

त्यामुळे प्रकाश आवाडे त्यांची मोठी ताकद डि. सी. पाटील अर्थात वंचितच्या मागे राहण्याची शक्यता आहे

. कारण आवाडेंना राजू शेट्टी आणि धैर्यशील माने दोघेही नको आहेत. ते आपली मते डि. सी. पाटील यांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वंचितचे डि. सी. पाटील यांचा फटका कोणाला बसणार यांचीच चर्चा सध्या हातकणंगले मतदार संघात सुरू आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज