rajkiyalive

(warana udbhav ) कोणत्याही परिस्थिती समडोळीतून वारणा उद्भवला पाणी देणार नाही

(WARANA UDBHAV YOJNA ) सर्वपक्षीय नेत्यांचा इशारा

वारणा खोर्‍यात अगोदरच पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे याचा फटका वारणा नदीकाठावरील शेतकर्‍यांना कायमच बसतो. उन्हाळ्यात आमची पिके वाळून जातात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सांगलीला वारणा नदीतून पाणी उचलू देणार नसल्याचा इशारा समडोळीचे माजी सरपंच महावीर चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले, सरपंच सौ. सुनीता हजारे, उपसरपंच कृष्णाजी मसाले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

 

 

वारणा उद्भव योजनेला विरोध करण्यासाठी समडोळी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, चांदोली येथे धरण बांधल्यानंतर वारणा काठ थोडाफार सुजलाफ सुफलाम झाला आहे. धरण बांधण्यासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्याचा आम्हाला म्हणावा असा परतावाही मिळाला नाही. धरणग्रस्तांचेही अजून पुनर्वसन झाले नाही. या गोष्टी तर समोर आहेतच पण त्याहीपेक्षा वारणा काठावरच पाण्याची कमतरता आहे. वारणा धरणातून वाकुर्डे बुद्रुक योजना, म्हैसाळ टेंभू योजना, सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडावे लागते. बाष्पीभवनामुळेही पाणी उडून जाते. गेल्या दहा वर्षात अनेकवेळा पाउस कमी पडला आहे. त्याचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसतो.

हेही वाचा
वारणा उद्भवचा अद्याप सर्व्हेच नाही
वारणा उद्भव योजनेमुळे हजारो एकर शेतीचे होणार नुकसान

वारणा नदीकाठावार मिरज, शिराळा, वाळवा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या आठ तालुक्यातील शेतकरी शेती करतात. 250 गावातील शेतकर्‍यांना या योजनेचा थेट फटका बसणार आहे. हजारो हेक्टर शेती धोक्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही येथून पाणी उचलू देणार नाही, असा निश्चय त्यांनी केला आहे.

समडोळी लवकरच ग्रामपंचायतीचे ठराव करून आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना देणार आहोत, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ढोले, अमजद फकीर, क्रांती पाटील, देविका पाटील, कोळी, दीपक मगदूम, भैरू जाधव आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज