rajkiyalive

(sangli ) वारणा उद्भव योजनेमुळे हजारो एकर शेतीचे होणार नुकसान the warana schem take from samdoli

(dineshkumar aitawade 9850652056)

सांगली शहर आणि कुपवाडसाठी सांगली महापालिकेने वारणा उद्भव पाणी योजना राबविण्याचा घाट घातला आहे. परंतु या योजनेमुळे वारणा काठावरील हजारो एकर शेतीचे नुकसान होणार असून, अगोदरच दारिद्र्यात पिचलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यासाठी वारणा काठावरील शेतकरी एकत्र येत असून, या योजनेला विरोध करण्याचे नियोजन होत आहे.

सांगली आणि कुपवाड शहराला सध्या कृष्णेचे पाणी पुरविण्यात येते. परंतु हे पाणी दुषित असल्याचे कारण सांगून वारणा नदीतून मिरज तालुक्यातील समडोळी येथून पाणी उचलण्याचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगलीच्या आयुक्तांनी नुकताच सांगितला आहे. या योजनेनुसार दहा किलोमिटरवर असणार्‍या समडोळी येथून पाणी उचलण्यात येणार आहे. समडोळी येथे छोटा बंधारा बांधून तेथून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होणार आहे.

वारणा उद्भव योजना असे या योजनेचे नाव आहे. तत्कालिन मंत्री स्व. मदन पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. आता पुन्हा या योजनेने उचल खाल्ली आहे. सांगलीतील लोकांना वारणेतून पाणी आणायचे कि थेट चांदोलीतून पाणी आणायचे यावरून वादविवाद, उपोषण सुरू आहेत.काहीही करून वारणेतून पाणी आणायचेच असा चंग सांगलीकरांना बांधला आहे.

हेही वाचा
वारणा उद्भवचा अद्याप सर्व्हेच नाही

 

कृष्णा नदी का स्वच्छ करत नाही?
वास्तविक सांगलीच्या उशाशी कृष्णा नदी आहे. वारणा नदीतून पाणी उपसा करण्याऐवजी जर कृष्णा स्वच्छ केली तर पैशाची बचत होईल, आणि कामही लवकर होईल. परंतु कृष्णा स्वच्छ करण्याचा कोणी विचारच करीत नाही. महागडी वारणा उद्भव योजनाच राबविण्याचा घाट घातला जात आहे आहे.

वारणा नदीवरील समडोळी हे शेवटचे गाव आहे. समडोळीत शेेवटचा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. चांदोली धरणाच्या निर्मितीसाठी वारणा काठावरील हजारो शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. सध्या या शेतकर्‍यांच्या अवस्था ना घरका ना घटका अशी झाली आहे. जमिनी दिल्या आम्ही आणि आता पाणी दुसर्‍याला देण्याचा घाट का घातला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वारणा काठावरील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकर्‍या या पाण्याचा लाभ मिळतो. सध्या निसर्गानेही पाठ फिरवली आहे.

पाउस थोडा कमी झाला तर सगळ्यात अगोदर त्याचा फटका बसतो तो शेतकर्‍यांना उपसाबंदी लगेच लागू केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांचे पिके वाळून आर्थिक नुकसान होते. शेतकरी कसाबसा वारणेच्या पाण्यावर आपली गुजराण करीत आहे. वारणा उद्भव ही योजना राबवली तर सांगली आणि आणि कुपवाडला मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागणार आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी येथील शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहे.

वारणा काठावर वाळवा, शिराळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, मिरज आदी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. वारणा धरणाचा लाभ ज्या ज्या शेतकर्‍यांना मिळाला आहे त्या शेतकर्‍यांच्या जमिनीला स्लॅब लावून सरकारने त्यांची शेती काढून घेतली आहे. त्यांना त्याचा म्हणावा तसा आर्थिक मोबदलाही मिळाला नाही. शेतकर्‍यांबरोबर पुनर्वसनग्रस्तांचीही तीच अवस्था आहे. अजूनही पुनर्वसनग्रस्त सोयी सुविधांसाठी टाहो फोडत आहेत. सरकारने त्यांचाही विचार केला नाही.

सांगलीची वारणा उद्भव योजना जर अंमलात आली तर वारणा काठावरील हजारो एकर शेतीला पाणी कमी पडणार यात काही शंका नाही. त्यामुळे वारणा काठावरील शेतकरी एकत्र येत असून, या योजनेला कोणत्याही परिस्थिती होवू द्यायचे नाही, असा ठराव सर्वत्र करण्यात येत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज