rajkiyalive

vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या 2 ऑगष्टला प्रसिद्ध होणार

जनप्रवास । सांगली

vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या प्रसिद्ध होणार : ऑक्टोंबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी 25 जुलैला प्रसिद्ध होणार होती, मात्र राज्यातील पूरस्थितीमुळे लांबणीवर गेली होती. 2 ऑगष्टला विधानसभेसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी सुरु आहे.

vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या प्रसिद्ध होणार

विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर आल्याने राजकीय हालचाली वाढल्या असताना प्रशासनाकडूनही निवडणुकीची तयारी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 25 जुलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याच्यावर 9 ऑगष्टपर्यंत हरकती आणि दावे दाखल करण्याची मुदत होती. परंतु राज्याच्या बहुतांशी भागात या कालावधीत अतिवृष्टी होवून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे 2 ऑगष्ट रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थयलांतरित झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्येच अर्ज करता येईल. ऑनलाईन पध्द्तीचा वापर करुन मतदार स्वत: नोंदणी, वगळणी, स्थलांतरण, दुरुस्ती करता येईल.

जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून येथे ऑफलाईन पध्द्तीने अर्ज सादर केले जाऊ शकतात. तसेच मतदार या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करु शकतात.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज