rajkiyalive

VIDHANSABHA ELECTION : विधानसभा निवडणुकीसाठी 25 जुलैला प्रारुप मतदार यादी

जनप्रवास । प्रतिनिधी

VIDHANSABHA ELECTION : विधानसभा निवडणुकीसाठी 25 जुलैला प्रारुप मतदार यादी : सांगली ः ऑक्टोंबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. 2 जुलैपासून मतदार नोंदणीसह दुरुस्ती करता येईल. जिल्ह्यात 11 मतदार मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, तर 25 जुलैला विधानसभेसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

VIDHANSABHA ELECTION : विधानसभा निवडणुकीसाठी 25 जुलैला प्रारुप मतदार यादी

2 जुलैपासून मतदार नोंदणी, प्रशासनाकडून तयारी सुरु

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्ता पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25 जुलै 2024 ते 9 ऑगष्ट 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तिरीय अधिकार्‍याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8 चे अर्ज उपलब्ध होतील. 2 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्येा अर्ज करुन शकतील. दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रसिध्दक होणार्‍या प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल.

मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थयलांतरित झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तीं ना चिन्हांरकित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्येच अर्ज करता येईल. ऑनलाईन पध्द्तीचा वापर करुन मतदार स्वत: नोंदणी, वगळणी, स्थलांतरण, दुरुस्ती करु शकतात.

जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व 282-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे स्थांपन करण्यात आली असून येथे ऑफलार्दन पध्दयतीने अर्ज सादर केले जाऊ शकतात. तसेच मतदार या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करु शकतात.

पुर्व-पुनरिक्षण उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी

मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/विभाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीला मान्यता घेणे. नमुना 1-8 तयार करणे आणि 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्याचा कालावधी 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 असा आहे. तर 20 ऑगष्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी सांगितले.

मतदार यादीचा कार्यक्रम

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध – 25 जुलै
दावे व हरकती स्वीकारणे – 25 जुलै ते 9 ऑगस्ट
विशेष मोहिमांचा कालावधी – दोन शनिवार व रविवार,
दावे व हरकती निकालात काढण – 19 ऑगस्ट
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध – 20 ऑगस्ट

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज