rajkiyalive

विधानसभेसाठी विश्वजीत कदमांसमोर जयश्रीताई समर्थक करणार शक्तीप्रदर्शन

जनप्रवास । सांगली

विधानसभेसाठी विश्वजीत कदमांसमोर जयश्रीताई समर्थक करणार शक्तीप्रदर्शन : काँग्रेसचे नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्काराचे नियोजन मदनभाऊ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. गुरूवारी सांगलीतील डेक्कन हॉलला हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला आ. विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे असणार आहेत. या निमित्ताने जयश्रीताई पाटील समर्थक आ. विश्वजीत कदम यांच्यासमोर विधानसभेसाठी शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

विधानसभेसाठी विश्वजीत कदमांसमोर जयश्रीताई समर्थक करणार शक्तीप्रदर्शन

खासदारांच्या सत्कारासाठी उद्या सांगलीत मेळावा

विधानसभेसाठी विश्वजीत कदमांसमोर जयश्रीताई समर्थक करणार शक्तीप्रदर्शन : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकजुटीमुळे विशाल पाटील यांचा विजय झाला. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला 19 हजाराचे मताधिक्य मिळाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी अडीचशेहून अधिक बैठका मतदारसंघात घेतल्या होत्या. त्यामुळे मदनभाऊ पाटील युवा मंच आता विधानसभेसाठी अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये आला आहे.

त्यांनी जयश्रीताई पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर वर्षभरापूर्वी जयश्रीताई पाटील यांनी मुंबईत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत आपण सांगली विधानसभा लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात संपर्कही वाढवला आहे.

आता मदनभाऊ युवा मंचने खासदार विशाल पाटील यांच्या सत्काराचे नियोजन केले आहे. त्यासाठी मदनभाऊ पाटील गट रिचार्ज केला आहे. गुरूवारी सायंकाळी सात वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जयश्रीताई पाटील या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज