rajkiyalive

विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत

जनप्रवास । सांगली

विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत : विशाल पाटील हे क्रांतीकारक वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. ते थोडे नाराज आहेत. पण माझा त्यांचाशी उत्तम संवाद आहे, ते वेगळी भूमीका घेणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात एकास-एक लढत होईल, असा विश्वास शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत

सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी खा. संजय राऊत सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. संजय राऊत म्हणाले, विशाल पाटलांची कोणी चिंता करू नये. ते आमच्याच कुटुंबातले महाविकास आघाडीचे सदस्य आहेत. दादा व बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. विशाल पाटील हे समजूतदार आहेत. ते वसंतदादांचे नातू आहेत. ज्यावेळी देश आणि स्वातंत्र्य संकटात आले तेव्हा वसंतदादांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी घेतला. त्यांनी कोणताही राजकीय स्वार्थ साधला.

ते आजोबांच्या विचारांपेक्षा कोणतीही भूमीका घेणार नाहीत.

विशाल पाटील यांचा डीएनए तोच आहे. त्यामुळे ते आजोबांच्या विचारांपेक्षा कोणतीही भूमीका घेणार नाहीत. ते जर नाराज असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू. अर्ज माघार घेण्याची मुदत 22 पर्यंत आहे. सकारात्मक निर्णय घेतील. आ. जयंत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सांगली लोकसभा एकास एकच लढत होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर संकट आले तेव्हा वसंतदादा पाटील शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला.

भाजप सोबत जो गट आहे जे स्वतःला ओरिजनल राष्ट्रवादी आणि शिवसेना समजतात त्यांच्याकडे काहीच नाही.

खा. संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष आणि ते राज्यात दिसणार नाहीत. भाजप सोबत जो गट आहे जे स्वतःला ओरिजनल राष्ट्रवादी आणि शिवसेना समजतात त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांना अनेक मतदारसंघात उमेदवार मिळत नाहीत. शिवाय ज्या पंतप्रधानांनी गेली दहा वर्षे देशात राज्य केले, अशा पंतप्रधानांना महाराष्ट्रात सर्वात जास्त सभा घ्याव्या लागतात, त्यांना इथे थांबावे लागते यातच दिसून येते की महाविकास आघाडीची ताकद किती वाढली आहे.

0000000000000000000000000000000000000000000000
मिरज तालुक्यात चंद्रहार पाटील यांच्यासमोर मोट बांधण्याचे आव्हान

मिरज तालुका तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत वादातून व जनसंपर्काच्या अभावामुळे काँग्रेसचा गट हा भाजपच्या ताब्यात गेला मात्र तरीही काँग्रेस नेत्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांची संपर्क ठेवला आहे. या माध्यमातून काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, जितेश कदम, विशाल पाटील जयश्रीताई पाटील यांचा वरचेवर मिरज तालुका तसेच पूर्व भागावर भेटीगाठी व दौरे होत असतात. मात्र नवखे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोर हेच मोठे आव्हान आहे. मिरज तालुक्यात भाजपचे सलग आमदार व ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमुळे भाजपचे संजयकाका पाटील व अपक्ष विशाल पाटील यांची थेट लढत होणार आहे.

कार्यकर्त्यांचा अभाव व जनसंपर्कची कमतरता व याचा प्रभाव अद्यापही प्रचारादरम्यान जाणून येत आहे.

नुकतेच शिवसेनेच्या मिरज पूर्व भागात भेटीगाठी दौरा संपन्न झाला. मात्र त्यालाही काही हातावर मोजण्या इतपत कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत घेऊन उमेदवार मैदानात येवुन निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

सिद्धार्थ जाधव यांनाही या गोष्टीचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

मात्र या सर्वांमध्ये पुढे येऊ घातलेल्या विधानसभेसाठी इच्छुक असणारे सिद्धार्थ जाधव यांनाही या गोष्टीचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूर्वीपासून मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. गावागावात भेटीगाठी, दौरेही कित्येक महिन्यांपासून त्यांनी सुरुवात केली आहे.

यात्रा उत्सव कुस्त्यांची मैदानी यांसारखे विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी आवर्जून हजेरी लावत आपणही विधानसभेसाठी उतरणार असल्याचे शड्डू मारून सांगितले आहे मात्र या दरम्यान चंद्रहार पाटील यांच्यासाठी मतदान करा असे सांगणेही शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान बनत आहे नवखा उमेदवार जनसंपर्काची कमतरता यामुळे त्यात विशाल पाटील यांच्यावर केलेली चंद्रहार पाटील यांनी टीका यामुळे पुर्व भागातील काँग्रेस प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनाही चंद्रहार पाटील यांच्यासाठी आव्हान करणे मोठे अडचणीचे ठरत आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज